संभाजी सेनेच्या स्थापनेत छावा संघटनेचा राडा

औरंगाबादेत संभाजी सेना नावाच्या संघटनेच्या स्थापना कार्यक्रमात जोरदार राडा झाला. छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कार्यक्रम उधळून लावण्याचा प्रयत्न केला. या हाणामारीत तीन कार्यकर्ते गंभीर जखमी झाले. रक्तबंबाळ होईपर्यंत कार्यकर्त्यांना मारण्यात आलं.

Updated: Jan 10, 2012, 06:35 PM IST

www.24taas.com, औरंगाबाद

 

औरंगाबादेत संभाजी सेना नावाच्या संघटनेच्या स्थापना कार्यक्रमात जोरदार राडा झाला. छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कार्यक्रम उधळून लावण्याचा प्रयत्न केला.

 

दोन्ही संघटनेच्या कार्यकर्त्यांत जोरदार हाणामारी झाली, त्यात ३ कार्यकर्ते गंभीर जखमी झालेत. छावा संघटनेच्याच नाराज कार्यकर्त्यांनी संभाजी सेना नावाची संघटना स्थापन करण्यासाठी तापडिया नाट्यमंदिरात कार्यक्रम आयोजित केला होता. तिथं छावा संघटनेचे कार्यकर्ते घुसले आणि धूडगूस घातला. शिवीगाळ, तुफान हाणामारी आणि तोडफोड असं नाट्य कितीतरी वेळ सुरु होतं.

 

हाणामारी करणारी मंडळी लातूरची असून बालाजी निकम आणि राजू अशी त्यांच्या म्होरक्यांची नावं होती. लोकांच्या डोळ्यात मिरचीची पुड टाकून नंतर त्यांनी तोडफोड केली. असं उपस्थित लोकांचं म्हणणं आहे.

 

या हाणामारीत तीन कार्यकर्ते गंभीर जखमी झाले. रक्तबंबाळ होईपर्यंत कार्यकर्त्यांना मारण्यात आलं. संभाजी सेनेचे तीन कार्यकर्ते यात जखमी झाले.

 

[jwplayer mediaid="26811"]