www.24taas.com, मुंबई
नक्षलवाद्यांना मदत केल्याच्या आरोपावरून डोंबिवलीतून चार संशयीतांना अटक करण्यात आली. यात दोन महिलांचाही समावेश आहे. एटीएस आणि स्थानिक पोलिसांनी संयुक्त कारवाई करून या चौघांना अटक करण्यात आल्याची पोलिसांच्या सूत्रांनी सांगितले.
आज दुपारी ही कारवाई करण्यात आली. संशयीतांकडून कम्प्युटर आणि काही प्रमाणात रोकड जप्त करण्यात आल्याचेही पोलिसांनी सांगितले. गेल्या काही काळापासून नक्षलवाद्यांना मदत पुरविल्याचा आरोप या चौघांवर लावण्यात आला आहे.
हे चौघे जण प्रत्यक्ष नक्षलवादी कारवायांमध्ये सामील आहेत, का याचीही चौकशी पोलीस करीत आहेत. या चौघांकडे सापडलेले साहित्य हे नक्षलवादी कारवायांशी संबंधीत असल्याचेही पोलिसांनी सांगितले आहे.
व्हिडिओ पाहा..
[jwplayer mediaid="59224"]