राष्ट्रगीत गाऊया, चला एकजूट दावूया....

राष्ट्रगीताच्या शताब्दी वर्षानिमित्त ठाण्यात राष्ट्रगीताच्या समुहगानाचा विक्रम घडणार आहे. दादोजी कोंडदेव स्टेडियमवर ५० हजार नागरिक जन-गण-मन हे राष्ट्रगीत गाणार आहेत.

Updated: Feb 25, 2012, 04:26 PM IST

www.24taas.com, ठाणे

 

राष्ट्रगीताच्या शताब्दी वर्षानिमित्त ठाण्यात राष्ट्रगीताच्या समुहगानाचा विक्रम घडणार आहे. दादोजी कोंडदेव स्टेडियमवर गायिका बेला शेंडे आणि गायक स्वप्नील बांदोडकर यांच्या सोबत ५० हजार नागरिक जन-गण-मन हे राष्ट्रगीत गाणार आहेत. आज या सोहळ्याला भारतीय क्रिकेट टीमचा माजी कॅप्टन कपिल देव हा देखील उपस्थित राहणार आहे.

 

यापूर्वी औरंगाबादलाही ५० हजार नागरिकांनी एकावेळी राष्ट्रगीत म्हटलं होतं. त्यानंतर आता ठाण्यातही तसा प्रयत्न होतो आहे. पोलीस बॅण्डसह लेझीम, पिरॅमीडचा समावेश या कार्यक्रमात होणार आहे.

 

तर असाच एक प्रयोग मराठी अभिमान गीत गाण्यासाठी रत्नागिरीत करण्यात आला होता. १ मे महाराष्ट्र दिनानिमित्त मराठी अभिमान गीताचे समहू गायन झाले होते. त्यामुळे आता राष्ट्रगीताचे समूह गायन होणार असल्याने ठाणेकर यांचा उत्साह ओसंडून वाहते आहे.