रेशनकार्ड मान्य, पण मिळत नाही धान्य

राज्यात दुष्काळामुळं जनता त्रासलीय. पाण्यासाठी सुरू असलेली वणवण असह्य झालेल्या अनेकांनी मुंबईची वाट धरलीय. पण इथेही त्यांच्या नशिबी अवहेलनाच आलीय. दुष्काळाला कंटाळून नवी मुंबईत आलेल्या लोकांना शासनान रेशनकार्ड दिलं खरं पण त्या कार्डावर धान्यच मिळत नसल्याची त्यांची तक्रार आहे.

Updated: Jun 5, 2012, 09:22 AM IST

www.24taas.com, नवी मुंबई

राज्यात दुष्काळामुळं जनता त्रासलीय. पाण्यासाठी सुरू असलेली वणवण असह्य झालेल्या अनेकांनी मुंबईची वाट धरलीय. पण इथेही त्यांच्या नशिबी अवहेलनाच आलीय. दुष्काळाला कंटाळून नवी मुंबईत आलेल्या लोकांना शासनान रेशनकार्ड  दिलं खरं पण त्या कार्डावर धान्यच मिळत नसल्याची त्यांची तक्रार आहे.

दुष्काळाच्या दुष्टचक्रातून बाहेर पडण्यासाठी यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्यातून नवी मुंबईत आलेल्या दुष्काळग्रस्तांना राज्य सरकारतर्फे १५ मेला रेशनकार्डांचं वाटप करण्यात आलं. अन्न आणि पुरवठा मंत्री अनिल देशमुख यांच्या हस्ते मोठा गाजावाजा करत रेशनिंग कार्ड देण्यात आली.  पण या रेशनकार्डावरून धान्यच मिळत नसल्याची दुष्काळग्रस्तांची तक्रार आहे. गावात पाणी नाही आणि शहरात पोटाला धान्य नाही अशीच अवस्था या दुष्काळग्रस्तांची झाली आहे.

दुसरीकडे दुष्काळग्रस्तांसाठी धान्यसाठा पुरवण्यात आला नसल्यानं धान्य देत येत नसल्याचं स्पष्टीकरण शिधावाटप अधिकारी देत आहेत. दुष्काळानं आधीच या लोकांची अवस्था दयनीय झालीय. त्यात शासनदरबारीही त्यांच्या पदरी उपेक्षा आलीय. त्यामुळे आता मदत मागायची तर कुणाकडे असा प्रश्न त्यांच्यासमोर पडलाय.