लॉजवर धाड, सेक्स रॅकेट उघडकीस

नवी मुंबईत गुन्हेगारीचं प्रकार दिवसेंदिवस वाढतच चालले आहेत. नवी मुंबई सारख्या हाय प्रोफाईेल शहरांमध्ये वेश्या व्यवसाय करणारं मोठं रॅकेट कार्यरत आहे.

Updated: Aug 5, 2012, 10:57 AM IST

www.24taas.com, नवी मुंबई

 

नवी मुंबईत गुन्हेगारीचं प्रकार दिवसेंदिवस वाढतच चालले आहेत. नवी मुंबई सारख्या हाय प्रोफाईेल शहरांमध्ये वेश्या व्यवसाय करणारं मोठं रॅकेट कार्यरत आहे. नवी मुंबई क्राईम ब्रान्चने नेरूळमधील राधाकृष्ण लॉज वर धाड टाकून वेश्या व्यवसाय करणारं रॅकेट उघडकीस आणलं आहे.

 

यात सात मुली आणि मुली पुरवणाऱ्या एजंटला अटक करण्यात आली आहे. चेंबूरमधून या लॉजवर मुली आणल्या जात. या पकडण्यात आलेल्या मुली आसाम,झारखंड मधील असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

 

परराज्यातून आणणेल्या या मुलींनी जबरदस्तीने वेश्याव्यवसायाला भाग पाडले जात असल्याचे समजते. मात्र पोलिसांनी कारवाईसाठी या मुलींनाही ताब्यात घेतलं आहे. त्यामुळे ह्या सेक्स रॅकेटचं जाळं दूरवर पसरले असण्याची शक्यता आहे.