वांगणीत दरोडेखोरांच्या टोळीला अटक

वांगणी परिसरात घरफोड्या करणारी 5 दरोडेखोरांची टोळी पोलिसांनी गजाआड केलीय. विशेष म्हणजे हे पाचही जण 18 ते 20 वयोगटातले आहेत.

Updated: Apr 1, 2012, 02:22 PM IST

www.24taas.com, कुळगाव-बदलापूर

 

वांगणी परिसरात घरफोड्या करणारी 5 दरोडेखोरांची टोळी पोलिसांनी गजाआड केलीय. विशेष म्हणजे हे पाचही जण 18 ते 20 वयोगटातले आहेत. वांगणीमध्ये गेल्या चार महिन्यांपासून घरफोड्यांचे सहा प्रकार घडले होते. वारंवार घडणा-या या प्रकारामुळे वांगणीकरांमध्ये भितीचं वातावरण पसरलं होतं.

 

पोलिसानांही या दरोडेखोरांना जेरबंद करण्यात अपयश येत होतं. मात्र गेल्या आठवड्यात झालेल्या घरफोडीनंतर पोलिसांना  एका खबरीकडून माहिती मिळाली. त्यानुसार सापळा रचून पाच जणांच्या टोळीला गजाआड करण्यात पोलिसांना यश आलंय. पोलिसांनी त्यांच्याकडून आठ तोळे सोने, 2 लॅपटॉप, 3 टीव्ही, एलसीडी, बाईक,  डीव्हीडी असा मुद्देमाल जप्त केलाय. बंद असलेल्या घरांना हेरून त्याचे कुलूप तोडत घरफोड्या करत असल्याची कबूली या आरोपींनी दिलीय.

Tags: