संस्था- बिल्डर्सच्या वादात खडसेंची उडी

ठाण्यातील श्रीष गृहनिर्माण संस्थेतील काही बंगल्यांच्या पुनर्बांधणीच्या कामावरुन संस्था आणि बिल्डर यांच्यात वाद सुरु आहे. या वादात विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांच्या आग्रहावरुन मुख्यमंत्र्यांनी पुनर्बाँधणीच्या कामाला स्थगिती आदेश दिलाय.

Updated: May 18, 2012, 01:48 PM IST

www.24taas.com, ठाणे

 

ठाण्यातील श्रीष गृहनिर्माण संस्थेतील काही बंगल्यांच्या पुनर्बांधणीच्या कामावरुन संस्था आणि बिल्डर यांच्यात वाद सुरु आहे. या वादात विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांच्या आग्रहावरुन मुख्यमंत्र्यांनी पुनर्बाँधणीच्या कामाला स्थगिती आदेश दिलाय. पण आता मुख्यमंत्र्यांनीच या प्रकरणाची चौकशी करुन अहवाल सादर करण्याचा आदेश नगरविकास खात्याला दिलाय.

 

ठाण्यातल्या या जुन्या छोट्या बंगल्यांची पुनर्बांधणी होणार होती. पण श्रीष गुहनिर्माण सोसायटीच्या पदाधिका-यांनी बिल्डरच्या हेतूविषयी शंका घेत पुर्नबांधणीचा करार रद्द केला. काही काळानं बिल्डरनं विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांना गाठलं. मग खडसे यांनी खुद्द मुख्यमंत्र्यांनाच या प्रकरणी बिल्डरच्या बाजूनं निर्णय देण्यास भाग पाडले.

 

सोसायटीच्या पुनर्बांधणीच्या कामाला स्थगिती देण्याचा आदेश मुख्यमंत्र्यांच्या नगरविकास खात्यानं काढला. पण सोसायटीच्या पदाधिका-यांनी पुन्हा मुख्यमंत्र्यांकडे धाव घेऊन त्यांना विरोधी पक्षनेते आणि बिल्डरच्या हातमिळवणीची माहिती दिली. आता या प्रकरणातला बेबनाव पूर्णपणे लक्षात आल्यावर मुख्यमंत्र्यांनी नगरविकास खात्याच्या प्रधान सचिवांना या प्रकरणाची चौकशी करुन तातडीनं अहवाल सादर करण्यास सांगितलंय.