झी २४ तास वेब टीम, नागपूर
मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आज नागपूरमध्ये ज्येष्ठ पत्रकार प्रविण बर्दापूरकर यांच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला उपस्थित होते. त्यानिमित्ताने राज ठाकरे आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी एकाच मंचावर हजर होते, राज ठाकरे यांनी आपल्या नेहमीच्याच शैलीत पत्रकारांवर हल्ला चढवला. तर दुसरीकडे या दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर कौतुकांचा वर्षाव केला.
राज यांनी केलेल्या बेळगाव सीमाप्रश्नी मिडीयाने दाखवलेल्या गोष्टीवर राज यांनी मिडीयाला चांगलेच धारेवर धरले, माझ्या वक्तव्याच मिडीयाने विपर्यास केला, तसचं त्यांनी इलेक्ट्रॉनिक मिडीयाला तर चांगलेच खडे बोल सुनावले, यांच्या प्रत्येक गोष्ठीमध्ये ठाकरे बंधूना ओढले जाते, हा काय लॉन टेनिसचा सामना आहे का? असा टोलाच राज यांनी मिडीयाला हाणाला. पण तसचं त्यांनी हळूच पत्रकारांना मिश्किलपणे चिमटा काढत गोंजारले सुद्धा कि, 'पत्रकारांना आता अंगावर नको घ्यायला, सध्या निवडणूका जवळ येत आहे',
त्याचप्रमाणे बेळगाव प्रश्नी विमानातून येतानाच गडकरींशी चर्चा केली. त्यामुळे गडकरी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्याशी याबाबत चर्चा करणार आहे. या पुस्तक प्रकाशानाच्या वेळी एकत्र आलेल्या या दोन दिग्गज नेत्यांनी एकमेकांची अगदी तोंड भरून स्तुती केली, नितीन गडकरी हा सच्चा आणि मोकळ्या ढाकळ्या मनाचा माणूस आहे, अश्या प्रकारे राज ठाकरे यांनी नितीन गडकरी यांच्यावर अक्षरश: स्तुतीसुमने उधळली.
तर गडकरी यांनी आपल्या भाषणाता पत्रकारांना शाबासकी देत त्यांचा कामाचे कौतुक केलं, तसचं त्यांनी राज ठाकरे यांचे कौतुक तर केलेच, पण पुढे जाऊन असेही म्हणाले की, आमची मैत्री वेगळी, आणि राजकारणातील मतभेद वेगळं. यावरूनच निवडणूकीच्या निमित्ताने या आता मनसे आणि भाजपा यांच्यात काही नवं राजकारण घडणार का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
[jwplayer mediaid="16352"]
[jwplayer mediaid="16384"]