नाशिककरांना आवडला मनसेचा 'फंडा'!

मनसेच्या अर्ज विक्रीला नाशिकमध्ये चांगला प्रतिसाद मिळतोय. दोन दिवसांत नाशिकमध्ये साडे पाचशे फॉर्म्स विकले गेलेत. विशेष म्हणजे हे फॉर्म्स भरण्यासाठी डॉक्टर, वकील, इंजिनिअर, प्राध्यापकांचीही गर्दी होतेय.

Updated: Nov 23, 2011, 08:30 AM IST

झी २४ तास वेब टीम, नाशिक

 

मनसेच्या अर्ज विक्रीला नाशिकमध्ये चांगला प्रतिसाद मिळतोय. दोन दिवसांत नाशिकमध्ये साडे पाचशे फॉर्म्स विकले गेलेत. विशेष म्हणजे हे फॉर्म्स भरण्यासाठी डॉक्टर, वकील, इंजिनिअर, प्राध्यापकांचीही गर्दी होतेय. मराठी जनतेला नवनिर्माणाचं स्वप्न दाखवत मनसे आपलं जनमत आजमावतेय. मात्र निवडणुकीपूर्वी असलेला हा उत्साह आणि कार्यकर्त्यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतरही राज साहेबांच्या आदेशाशी एकनिष्ठ राहील का, हा खरा प्रश्न आहे.

 

सुनिता रणाते हे त्याचंच एक उदाहरण आहेत.  सुनिता रणाते या बिटको गर्ल्स हायस्कूलमध्ये अर्थशास्त्र शिकवणाऱ्या या प्राध्यापिका. पण, अर्थशास्त्रामागचं गणित शिकवणा-या  सुनितांनी आता मतदारांची आकडेमोड करायला सुरुवात केलीय. राजकारणातल्या अशिक्षित आणि गुन्हेगार लोकांना घरी बसवण्यासाठी मनसेचा परीक्षा फंडा त्यांना आवडलाय.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x