नाशिकच्या आमदारकीचं होणार तरी काय?

विधान परिषदेच्या नाशिक मतदार संघाच्या निकालाबाबतचा पेच कायम आहेत. पहिल्या फेरीत दोन्ही उमेदवारांना समान मते मिळाल्यानंतर फेरमतमोजणी करण्यात आली.

Updated: May 28, 2012, 04:21 PM IST

www.24taas.com, नाशिक

 

विधान परिषदेच्या नाशिक मतदार संघाच्या निकालाबाबतचा पेच कायम आहेत. पहिल्या फेरीत दोन्ही उमेदवारांना समान मते मिळाल्यानंतर फेरमतमोजणी करण्यात आली. मात्र फेरमतमोजणीतही दोन्ही उमेदवारांना प्रत्येकी २२१ मते मिळाल्यामुळं घटनात्मक पेच निर्माण झाला आहे. सहा जागांपैकी पाच जागांचे निकाल हाती आले आहेत. फक्त नाशिकचा निकाल हाती आलेला नाही.

 

याबाबत राज्य निवडणूक आयोगानं अहवाल मागवला आहे. मात्र तज्ज्ञांच्या मतानुसार आता ईश्वर चिठ्ठीनं किंवा फेरमतदानाचा पर्याय निवडणूक आयोगासमोर आहे. त्यामुळं आता निवडणूक आयोग काय निर्णय घेणार याबाबत उत्सुकता लागली आहे. राष्ट्रवादीचे जयंत जाधव आणि शिवसेनेचे शिवाजी सहाणे यांच्यात जोरदार चुरस झाली.

 

पहिल्या मतमोजणीत दोघांना सारखीच म्हणजे प्रत्येकी २२४ मते मिळाली. त्यानंतर फेरमोजणी घेण्यात आली. मात्र त्यातही दोघांना सारखीच मतं मिळाली आहेत. त्यामुळं आता विजयाची माळा कुणाच्या गळ्यात पडणार याबाबत उत्कंठा शिगेला पोहचली आहे.