'मनमाड एक्सप्रेस'मध्ये तृतीयपंथींची लूटमार

मनमाड स्टेशनवर एक्स्प्रेसमध्ये तृतीय पंथीयांनी लूटमार करत सात जणांना मारहाण केली आहे. रेल्वे पोलिसांनी तडकाफडकी या टोळीतल्या दोन तृतीय पंथियांना अटक केली.

Updated: Mar 3, 2012, 08:23 PM IST

योगेश खरे, www.24taas.com, नाशिक

 

मनमाड स्टेशनवर एक्स्प्रेसमध्ये तृतीय पंथीयांनी लूटमार करत सात जणांना मारहाण केली आहे. रेल्वे पोलिसांनी तडकाफडकी या टोळीतल्या दोन तृतीय पंथियांना अटक केली.

 

मनमाड स्टेशनवर एक्स्प्रेसमध्ये लुटपाट करणारी तृतीयपंथायांची टोळी रेल्वे पोलिसांनी पकडलीए.पुण्याहून पाटण्याला जाणाऱ्या एक्स्प्रेसमध्ये भुसावळजवळ तृतीय पंथीयांनी प्रवाशांकडून शंभर रुपयांची मागणी केली. मात्र, पैसे देण्यास नकार देणाऱ्या प्रवाशांना दोन तृतीयपंथीयांनी हातोड्यानं मारहाण करत तब्बल ९३ हजारांची लूट केली. नाशिकमधून पुणे, मध्यप्रदेश आणि मराठवाड्यात जाणाऱ्या ट्रेन्समध्ये या टोळ्यांनी उच्छाद मांडला होता.

 

याआधीही याच रेल्वे मार्गावर मुख्यमंत्र्यांच्या पत्नी, माजी मंत्री सुर्यकांता पाटील यांनाही अशाच वाटमारीचा फटका बसला होता. आता मात्र लुटमार तृतीय पंथीयांनीच सुरू केल्यामुळे प्रवाशांमध्ये दहशतीचं वातावरण आहे. प्रवाशांचा वाढता त्रास लक्षात घेता गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळणाऱ्या या तृतीय पंथीयांना वेळीच आळा घालण्याची गरज निर्माण झाली आहे.