www.24taas.com, नाशिक
नाशिकमध्ये स्वाईन फ्लूचा प्रादूर्भाव वाढत चालला असून स्वाईन फ्लूमुळे दुसरा बळी गेला आहे. १ एप्रिलला जिल्हा रूग्णालयात दाखल झालेल्या भारत ठाकूरचा बुधवारी मृत्यू झाला होता. त्यामुळे नाशिकमधील नागरिकांनी योग्य ती काळजी घेण्याचं आवाहन वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केलं होतं.
नाशिकमध्ये स्वाईन फ्लूने पहिला बळी घेतला होता. नंदू चव्हाण असं या मृत व्यक्तिचं नाव होतं. १ एप्रिलपासून ते जिल्हा रुग्णालयात दाखल होते. शहरात स्वाईन फ्लूची साथ सुरु झाली असून, त्यात पहिला बळी गेल्यानं जिल्हा प्रशासन सतर्क झालं होतं. नाशिककरांनी काळजी घ्यावी, असं आवाहन आरोग्य यंत्रणेनं केलं. याआधी पुण्यामध्ये स्वाईन फ्लूच्या बळींचे सत्र सुरू होते. पुण्यात एका विद्यार्थिनीसह महिलेचा मृत्यू झाल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
पुण्यातील दीप बंगला चौक आणि खराडी येथील शाळेमध्ये स्वाइन फ्लूचे रुग्ण सापडल्यामुळे आरोग्य विभागाकडून या दोन शाळांची तपासणी करण्यात आली होती. सर्दी, ताप, खोकला ही लक्षणे असणाऱ्यांनी योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य यंत्रणेने केले आहे.