कामशेत जवळ विद्यावती अनाथाश्रमातल्या ४५ अल्पवयीन मुलांची नावं बदलण्याचा प्रकार घडलाय. त्यांचं आडनाव बदलून अग्रवाल हे नाव लावण्यात आलंय. त्यामुळं खळबळ उडालीय. यात २३ मुली २२ मुलांचा समावेश आहे. ही सर्व मुलं खंडाळ्याच्या ज्या शाळेत शिकत होती तिथं हा प्रकार उघड झालाय. तसंच आश्रमातली एक १४ वर्षाची मुलगी गर्भवती असल्याचा प्रकारही घडलाय. मात्र हा बलात्कार १२ वर्षाच्या मुलानं केल्याचं अनाथाश्रमाच्या व्यवस्थापनाकडून सांगण्यात येतय. या मुलावर खापर फोडण्याचा प्रकार सुरु आहे. या प्रकरणी आश्रमाकडून कुठलीही माहिती दिली जात नाहीये. तसंच आश्रमाचा संचालक राजेश गुप्ता आणि व्यवस्थापक अशोक घाडगे दोघेही गायब आहेत. त्यामुळं गूढ आणखी वाढलंय.