झी २४ तास वेब टीम, मुंबई
पुण्यात सुरु असलेली ऊसदराची चर्चा फिस्कटली. आज दिवसभर संध्याकाळ पर्यंत तोडगा निघेल असं चित्र निर्माण झालं होतं. सरकारवर कारखानदारांचा दबाव आहे आणि उद्या चर्चेतून तोडगा निघाला नाही तर आंदोलन अधिक तीव्र करावा लागेल असा इशारा राजू शेट्टींनी राज्य सरकारला दिला आहे. राज्यभरात चक्काजाम करण्याचा इशारा राजू शेट्टींनी दिला आहे. उद्या परत दीड वाजता चर्चेला सुरवात होणार आहे. ही तर शासनाची लबाडी आहे असं जोरदार टीकास्त्र रघुनाथदादा पाटील यांनी सरकारवरसोडलं. उद्याची बैठकी ही अंतिम असेल. सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी अंतिम तोडगा निघाला नसून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी बोलून यातून मार्ग काढू असं सांगितलं.