पिंपरी-चिंचवडमधील हॉस्पिटलचा 'आगाऊ' प्रस्ताव

पिंपरी-चिंचवडमध्ये असलेलं य़शवंतराव चव्हाण हॉस्पिटल गरिबांसाठी मोठं वरदान ठरलं आहे. पण आता याच हॉस्पिटलमध्ये आगाऊ रक्कम भरल्याशिवाय इलाज नाही, असा अजब प्रस्ताव स्थायीसमोर ठेवण्यात आलाय.

Updated: Feb 29, 2012, 05:45 PM IST

कैलास पुरी, 24taas.com, पिंपरी-चिंचवड

 

पिंपरी-चिंचवडमध्ये असलेलं य़शवंतराव चव्हाण हॉस्पिटल गरिबांसाठी मोठं वरदान ठरलं आहे. पण आता याच हॉस्पिटलमध्ये आगाऊ रक्कम भरल्याशिवाय इलाज नाही, असा अजब प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवण्यात आलाय. अर्थात होणारा विरोध पाहता हा प्रस्ताव फेटाळला जाण्याचीच शक्यता आहे.

 

पिंपरी-चिंचवडचं हे यशवंतराव चव्हाण हॉस्पिटल गरिबांसाठी मोठा आधार आहे. पण आता याच ह़ॉस्पिटलमध्ये रुग्णांना दाखल करताना आगाऊ रक्कम घेण्याचा अजब प्रस्ताव प्रशासनान स्थायी समितीसमोर ठेवलाय. या निर्णयावर विरोधकांनी टीका केलीय. या प्रस्तावावर सुरुवातीला गप्प बसलेल्या सत्ताधाऱ्यांनी संभावित विरोध लक्षात घेता घूमजाव केलंय आणि हा प्रस्ताव फेटाळणार असल्याचं सांगितलंय.

 

वास्तविक पाहता सत्ताधाऱ्यांनी हिरवा कंदील दाखवल्याशिवाय प्रशासनानं हा प्रस्ताव ठेवलाच नसता, असं विरोधकांचं म्हणणं आहे. हा प्रस्ताव फेटाळला जाईल असं सध्या सांगण्यात येत असलं तरी जोपर्यंत तो फेटाळला जात नाही, तोपर्यंत लोकांनी त्यावर विश्वास ठेवायचा कसा...