पुण्यात माथेफिरूनं ७ जणांना चिरडलं

स्वारगेट बस टेपोतून एका माथेफिरूने एसटी पळविली. तो एवढ्यावर न थांबता त्याने १० तो १२ जणांना चिरडले. या प्रकारामुळे पुणे शहर हादरले आहे. निलायम सिनेमाजवळ पोलिसांनी एसटी अडवली. मात्र, त्यापूर्वी त्यांने एसटीने २२ जणांना उडविले.

Updated: Jan 25, 2012, 02:52 PM IST

www.24taas.com, पुणे

 

स्वारगेट बस डेपोतून एका माथेफिरूने एसटी पळविली. तो एवढ्यावर न थांबता त्याने ७ जणांना चिरडले. या प्रकारामुळे पुणे शहर हादरले आहे.

 

पुण्यातील स्वारगेट बस डेपोमधून एस.टी. पळवल्याची खळबळजनक घटना घडली आहे. ही एस.टी. पळवून नेताना रिक्षा आणि काही जणांना उडवलं आहे. यात २५ जण जखमी झाले आहेत. तर ७ जणांचा मृत्यू झाला आहे. आज सकाळी झालेल्या या प्रकाराने पुणेकर काहीकाळ चांगलेच हादरून गेले. ही एसटी सातारा बस डेपोची असून सोलापूरच्या दिशेनं पळवण्यात आली होती. मात्र पोलिसांनी पाठलाग करत ही बस निलायम थिएटरजवळ पकडली. संतोष माने असं या माथेफिरुचं नाव असून सध्या तो पोलिसाच्या ताब्यात आहे.

 

निलायम सिनेमाजवळ पोलिसांनी एस.टी. अडवली. मात्र, त्यापूर्वी त्यांने एसटीने २५ जणांना उडविले. भरधाव वेगाने जाणाऱ्या एसटीने २५ गाडया उडविल्या. यात २२ जण गंभीर जखमी झाले आहेत. संतोष माने या माथेकरूने हे कृत्य कसे  केले याचा शोध पोलीस करीत आहेत. हा अतिरेकी हल्ला असावा, असा संशय निर्माण झाला होता. मात्र, आता तो संशय दूर झाला आहे. या माथेफिरुने चालवलेल्या सुमारे २५ किलोमीटरच्या टप्यात अनेक वाहनाचा चुराडा झाला आहे. दरम्यान माथेफिरुच्या या प्रकारानं अनेक वाहनाना धडक देत वाहनचालकांना आणि पादचाऱ्यांना धडक दिली असल्याने जखमींचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे.

 

[jwplayer mediaid="35402"]