पोलीस असल्याचे भासवून दागिन्यांची चोरी

पोलीस असल्याचे सांगून सांगलीतल्या सराफी दुकानात चोरट्यांनी हात साफ केला. चिंतामणनगरमधील अक्षरा ज्वेलर्समधून पोलीस असल्याचे सांगून चोरट्यांनी सात तोळ्याचे दागिने लंपास केले. मात्र एका ठिकाणी चोरी केल्यानंतर दुस-या दुकानात चोरट्यांचा डाव फसला.

Updated: Jul 15, 2012, 07:27 AM IST

www.24taas.com , सांगली

पोलीस असल्याचे सांगून सांगलीतल्या सराफी दुकानात चोरट्यांनी हात साफ केला. चिंतामणनगरमधील अक्षरा ज्वेलर्समधून पोलीस असल्याचे सांगून चोरट्यांनी सात तोळ्याचे दागिने लंपास केले. मात्र एका ठिकाणी चोरी केल्यानंतर दुस-या दुकानात चोरट्यांचा डाव फसला.

माधवनगर मधील राधाकृष्ण ज्वेलर्स या दुकानच्या मालकाच्या सतर्कते मुळे चोरटा तेथून पळून गेला. मात्र हा चोरटा सी सी टी व्ही मध्ये कैद झालाय. पोलीस असून दुकानाची पाहाणी करायला आलो आहे, असे सांगून चोरांनी अक्षरा ज्वेलर्समध्ये प्रवेश केला. तुमच्या दुकानात सोने किती आहे, ते दाखवा असे चोरट्यानी सांगितले. घाबरलेल्या दुकानदाराने सोन्याचे दागिने दाखवण्यास सुरवात केली.

आणखीन किती सोने आहे,ते बाहेर काढा असे म्हंटल्यावर दुकानदार आतील खोलीत गेला. त्यावेळी सात तोळे सोने घेवून चोरटे पसार झाले. त्या नंतर चोरटे माधवनगर मधील राधा कृष्ण ज्वेलर्स मध्ये गेले. तेथे त्यांनी तसाच प्रकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र दुकानादराने मालकाला फोन लावतो असे सांगताच चोरट्यांनी तेथून पळ काढला. मात्र हा चोरटा सी सी टी व्ही मध्ये कैद झाला.