मनसेची राडागिरी, हंडाफोड करताहेत मठकरी!

पुण्यात पाणी पेटलंय. पाणीकपातीविरोधात मनसे आणि भाजपनं पुण्यात आंदोलन केलयं. मनसेनं याविरोधात आक्रमक होत महापालिकेच्या जलअभियंत्याला घेराव घातला, तसंच त्याला आंघोळ घातली. तर दुसरीकडे भाजपनं सिंचन भवनासमोर मटका फोडो आंदोलन केलं.

Updated: Mar 2, 2012, 01:51 PM IST

www.24taas.com, पुणे

पुण्यात पाणी पेटलंय. पाणीकपातीविरोधात मनसे आणि भाजपनं पुण्यात आंदोलन केलयं. मनसेनं याविरोधात आक्रमक होत महापालिकेच्या जलअभियंत्याला घेराव घातला, तसंच त्याला आंघोळ घातली. तर दुसरीकडे भाजपनं सिंचन भवनासमोर मटका फोडो आंदोलन केलं.

 

आवश्यकतेपेक्षा जास्त पाणी सोडून मतदारांना खुश करण्याचा कार्यक्रम राष्ट्रवादी काँग्रेसने केला. त्यामुळे या राष्ट्रवादीच्या या उधळपट्टीमुळे आणि नियोजन शून्यतेमुळे आज पुणेकरांचे पाण्यावाचून हाल होत आहे. त्यांचे पाणी तोडले गेले असल्याचा आरोप भाजपचे शहराध्यक्ष विकास मठकरी यांनी केला.

 

सर्व महिला रिकामे हंडे घेऊन आलो आहोत, आणि अजित पवारांची दादागिरी आणि टगेगिरी वाढली आहे. पुण्याच्या महिलांच्या तोंडच पाणी पळवलं आहे, त्यांना याचा जाब विचारण्यासाठी आम्ही संचनभवन येथे आलो असल्याचे भाजपच्या मोर्चात सामील असलेल्या एका महिलेने सांगितले.

Tags: