माथेफिरूने कसा घातला हैदोस...

पुण्यात संतोष माने या माथेफिरु एसटी ड्रायव्हरनं बस पळवून वाटेत येणाऱ्यांना अक्षरशः चिरडलं. त्यामध्ये ८ जणांचा मृत्यू झालाय, तर पंचवीस जण जखमी झालेत. संतोष माने या माथेफिरुनं सकाळी आठ वाजण्याच्या सुमाराला पुण्याच्या स्वारगेट डेपोमधून एसटी बस पळवली.

Updated: Jan 25, 2012, 03:51 PM IST

www.24taas.com, पुणे

 

पुण्यात संतोष माने या माथेफिरु एसटी ड्रायव्हरनं बस पळवून वाटेत येणाऱ्यांना अक्षरशः चिरडलं. त्यामध्ये ८ जणांचा मृत्यू झालाय, तर पंचवीस जण जखमी झालेत. संतोष माने या माथेफिरुनं सकाळी आठ वाजण्याच्या सुमाराला पुण्याच्या स्वारगेट डेपोमधून एसटी बस पळवली. कसा हौदोस घातला या माथेफिरूने हे पाहता येईल

 

पुण्यात स्वारगेट डेपोमधून माने एसटी घेऊन निघाला.... स्वारगेट डेपोला दोन वळसे घालून तो हडपसरच्या दिशेनं पूल गेटला पोहोचला. पूल गेटला दोन वेळा वळसे घालून तो एसटी घेऊन ई स्ट्रीटला गेला. पूल गेट ते ई स्ट्रीटच्या दरम्यान त्यानं एक बाईकस्वाराला उडवलं. त्यानंतर भवानी मंदिरमार्गे तो सेव्हन लव्ज चौकात पोहोचला.

 

वाटेत येईल त्याला उडवत माने एसटी घेऊन लक्ष्मीनारायण चौक मार्गे तो सारसबागेकडे गेला. सारसबागेतून दांडेकर पूलाकडे पोहोचल्यानंतर तो निलायम चौकात पोहोचला. तिथेच त्याला पकडण्यात आलं. पुणे- सातारा- पुणे ही एसटी घेऊन तो पूल गेटला गेला. चुकीच्या दिशेनं एसटी चालवणा-या संतोष मानेनं वाटेत येणा-या वाहनांना उडवलं. अनेक गाड्यांचा अक्षरशः चक्काचूर झाला.  सुमारे पंचवीस किलोमीटरपर्यंत संतोषनं बेदरकारपणे आणि अंदाधुंदीनं बस चालवली.