‘अण्णांनी पातळी सोडून बोलायला नको होतं’

अण्णांनी पातळी सोडून बोलायला नको होतं असं वक्तव्य मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पुणे इथे केलं आहे. ज्येष्ठ नेते शरद पवारांवर दिल्लीत झालेल्या हल्ल्याच्या संदर्भात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी एकही मारा असा प्रति प्रश्न पत्रकारांना केला होता. त्याबद्दल संतप्त प्रतिक्रिया कालपासून सर्वत्र उमटत आहेत.

Updated: Nov 25, 2011, 01:43 PM IST

झी २४ तास वेब टीम, पुणे

अण्णांनी पातळी सोडून बोलायला नको होतं असं वक्तव्य  मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पुणे इथे केलं आहे.  ज्येष्ठ नेते शरद पवारांवर दिल्लीत झालेल्या हल्ल्याच्या संदर्भात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी एकही मारा असा प्रति प्रश्न पत्रकारांना केला होता. त्याबद्दल संतप्त प्रतिक्रिया कालपासून सर्वत्र उमटत आहेत.

आज मुख्यमंत्री यांनी त्याविषयी विचारला असता अण्णांनी पातळी सोडून बोलायला नको होतं अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी राळेगण सिध्दीतही अण्णां विरोधात जाऊन आंदोलन करण्याच प्रयत्न केला. त्यावेळेस राळेगण सिध्दीचे ग्रामस्थ आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते यांच्यात धुमश्चक्री झाली.