पश्चिम घाटाला जागतिक वारशाचा दर्जा

जैव विविधतेची खाण असलेल्या पश्चिम घाटाला युनेस्कोनं जागतिक वारशाचा दर्जा दिलाय. पाच राज्यांमध्ये पसरलेल्या 1600 किमी लांबीच्या या पर्वत रांगांवर हिमालयापेक्षाही प्राचीन जंगल आहे. भारताच्या मॉन्सूनवर या पर्वत रांगांचा प्रभाव आहे.

Updated: Jul 2, 2012, 03:46 PM IST

www.24taas.com, मुंबई

जैव विविधतेची खाण असलेल्या पश्चिम घाटाला युनेस्कोनं जागतिक वारशाचा दर्जा दिलाय. पाच राज्यांमध्ये पसरलेल्या 1600 किमी लांबीच्या या पर्वत रांगांवर हिमालयापेक्षाही प्राचीन जंगल आहे. भारताच्या मॉन्सूनवर या पर्वत रांगांचा प्रभाव आहे.

हा घाट गुजरात महाराष्ट्रपासून कन्याकुमारी पर्यंत पसरलेला आहे. हा घाट देशाच्या पाच टक्के भूभागापैकी असला तरी देशातल्या 27 टक्के वनस्पती या घाटावर आढळतात. पाच हजारहून जास्त वनस्पती आढळतात. 149 सस्तन प्राण्यांच्या प्रजाती, 508 पक्षांच्या प्रजाती आणि 189 उभयचर प्राण्यांच्या प्रजाती आढळतात.  त्य़ामुळे या घाटातील कास पठार कोयना अभयारण्य यांचाही समावेश जागतिक वारसा यादीत होतोय. कोल्हापूरपासून ते नाशिकपर्यंतचा महाराष्ट्र व्यापणारा पश्चिम घाट विविध समस्यांनी ग्रासला गेल्यामुळं सध्या चर्चेत आहे.

वर्षातून एकदा होणा-या युनेस्कोच्या जागतिक वारसा समितीच्या बैठकीत पश्चिम घाटाव्यतिरिक्त जर्मनीतील ऐतिहासिक मार्गाव्हायल ऑपेरा हाऊस, पोर्तुगालमधील एल्वास हे शहर आणि त्याची तटबंदी आदींचाही जागतिक वारशाच्या यादीत समावेश करण्यात आलाय.