आला रे आला नवा आयफोन आला

ऍपल iPhone 4S च्या किंमती जाहीर झाल्या आहेत. एअरटेल iPhone 4S (16 GB) चे बेस मॉडेल ४४,५०० रुपयांना तर 64 चे टॉप एंड मॉडेल ५७,५०० रुपयांना उपलब्ध करुन देणार आहे. तर 32 GB चे मॉडेल ५०,९०० रुपयांना मिळेल.

Updated: Nov 18, 2011, 03:28 PM IST

झी २४ तास वेब टीम, नवी दिल्ली

ऍपल iPhone 4S च्या किंमती जाहीर झाल्या आहेत. एअरटेल iPhone 4S (16 GB) चे बेस मॉडेल ४४,५०० रुपयांना तर 64 चे टॉप एंड मॉडेल ५७,५०० रुपयांना उपलब्ध करुन देणार आहे. तर 32 GB चे मॉडेल ५०,९०० रुपयांना मिळेल.
ऍपल २५ नोव्हेंबरला iPhone 4S मॉडेल लँच करणार आहे. नवा आयफोन ग्राहकांना २४ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीच उपलब्ध होणार आहे. सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या iPhone 4 आणि 3GS च्या किंमतींमध्ये वाढ करण्यात येणार आहे. एअरटेल आणि एअरसेल इतर देशांमध्ये ऑपरेटर प्रमाणे हँडसेटसाठी सबसिडी देणार नाहीत. ऑपरेटर ज्या देशांमध्ये हँडसाठी सबसिडी देतात तिथे आयफोन खुपच स्वस्तात उपलब्ध होतो. iPhone 4 (8GB)ची सुधारीत किंमत ३७,९०० रुपये आहे तर iPhone 3GS मॉडेलची किंमत २०,९०० रुपये इतकी असणार आहे. भारती एअरटेलने आयफोनच्या 16 आणि 32 मॉडेलसाठी बुकिंग सुरू केलं आहे. एअरसेलने अजुन बुकिंग सुरु केलेलं नाही.
iPhone 4 S मध्ये ड्युल कोअर प्रोसेसर, उत्कृष्ट ग्राफिक्स चीप, 8 मेगा पिक्सेल कॅमरा हे फिचर्स असतील. तर सिरी नावाचे व्हॉईस एनाबल्ड व्हर्च्युल असिस्टंट या खास फिचरमुळे अनेक फंक्शन उपलब्ध होतील.