मोबाईलचे कॉल दर वाढणार

बातमी मोबाईलधारकांसाठी. आता मोबाईलवर तासानतास बोलत असालतर सावधान. मोबाईल कॉल दरात वाढ होण्याची शक्यता आहे. प्रति मिनिट ३० पैसे कॉल दर वाढू शकतात. तसे संकेत भारतीय दूरसंचार निगमने दिले आहेत.

Updated: Aug 4, 2012, 09:21 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली

बातमी मोबाईलधारकांसाठी. आता मोबाईलवर तासानतास बोलत असालतर सावधान. मोबाईल कॉल दरात वाढ होण्याची शक्यता आहे. प्रति मिनिट ३० पैसे कॉल दर वाढू शकतात. तसे संकेत भारतीय दूरसंचार निगमने दिले आहेत.

मोबाईलवरचं बोलणं महागण्याची शक्यता आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने स्पेक्ट्रमच्या लिलावाचे कमीतकमी मूल्य १४ हजार कोटी रूपये ठरवल्याने आता फोन करणं महाग होणार आहे.

टेलीकॉम कंपन्यांच्या म्हणण्यानुसार मोबाईलचा कॉल रेट ३० पैसे प्रती मिनिटापर्यंत वाढू शकतो. मोबाईल सेवा महाग होणार हे निश्चित झालं असून मोबाईल कंपन्यांचे नवीन कॉलरेट काय असणार याकडे आता, सर्वसामान्यांचं लक्ष लागलंय.

केंद्रीय मंत्रिमंडळाने शुक्रवारी ईजीओएम म्हणजेच दुरसंचार विभागांबाबत निर्णय घेणा-या मंत्रिगटाने ठरवलेल्या रकमेला मंजूरी दिली आहे. त्यामुळे देशात मोबाईल सेवा सुरू करण्यासाठी इच्छुक कंपनीला कमीत कमी १४ हजार कोटी इतक्या रकमेची बोली लावावीच लागणार आहे.

टू-जी घोटाळा उघडकीला आल्यानंतर सुप्रीम कोर्टाने १२२ लायसन्स रद्द करून ३१ऑगस्टपर्यंत पुन्हा लिलाव करण्याचे आदेश दिले होते.