www.24taas.com, वॉशिंग्टन
अचानक उद्भवणारी पायदुखी, किंवा अस्वस्थता यामुळे बरेच लोक सतत पाय हलवत असतात. या विनाकारण पाय हलवण्याचं मूळ आपल्या जैविक संरचनेत असतं. भारतीय शास्त्रज्ञ सुभब्रत संन्याल यांच्या अध्यक्षतेखाली केल्या गेलेल्या प्रयोगामधून हे सत्य बाहेर आलं आहे की, पायांच्या अस्वस्थतेचं मूळ कारण जीन्समध्येच आहे.
एम्रोए विश्वविद्यालयामध्ये यावर संशोधन केलं गेलं. फळांवर बसणाऱ्या माशांवरून हा शोध लागला. या माशांमध्ये असणाऱेया BTBD 9 या जीनचा अभ्यास केला गेला. या जीनमुळे माशांच्या शांत झोपेमध्ये अडथळा येतो. माणसांनाही या जीन्समुळे गाढ झोप मिळू शकत नाही.
लाइव्ह सायंस या नियतकालिकात संन्याल यांनी सांगितलं आहे, की या शोधातून आम्ही पायांच्या अस्वस्थतेचं कारण शोधत आहोत. पायांच्या अस्वस्थतेमागचं जैविक कारण कुठलं, याचा आम्ही अभ्यास करत आहोत.