इटलीने आयर्लंडला दाखवला बाहेरचा रस्ता....

क्वार्टर फायनल गाठण्याकरता ग्रुप सीच्या अखेरच्या लीग मॅचमध्ये मैदानात उतरलेल्या युरो चॅम्पियन इटलीने अखेर रिपब्लिक ऑफ आयर्लंडचा 2-0 ने पराभव करत पुढील फेरीत एन्ट्री केली.

Updated: Jun 19, 2012, 09:48 AM IST

www.24taas.com, पोझनन

 

क्वार्टर फायनल गाठण्याकरता ग्रुप सीच्या अखेरच्या लीग मॅचमध्ये मैदानात उतरलेल्या युरो चॅम्पियन इटलीने अखेर रिपब्लिक ऑफ आयर्लंडचा 2-0 ने पराभव करत पुढील फेरीत एन्ट्री केली. इटलीच्या या विजयाचे शिल्पकार ठरले ते ऍन्टोनिओ कॅसानो आणि बालोटेली.. क्वार्टर फायनलमध्ये इटलीसमोर ग्रुप डी मध्ये टॉप पोझिशन मिळवणा-या टीमचं आव्हान असणार आहे...

 

पोझनान येथे झालेल्या इटली विरूद्ध रिपब्लिक ऑफ आयर्लंड, ग्रुप सी मधील अखेरच्या मॅचमध्ये इटलीने 2-0ने विजय मिळवला... इटलीच्या या विजयाने त्यांचा क्वार्टर फायनलमधील प्रवेशाचा मार्गही मोकळा झाला....2004 युरो चॅम्पियन असणा-या इटलीची युरो 2012 लीग स्टेजमधील सुरूवात तशी अडखळतीच झाली...लीगच्या पहिल्या दोन्ही मॅचेस ड्रॉ झाल्याने पॉईंट टेबलमध्ये तिसरं स्थान मिळवणा-या इटलीला क्वार्टर फायनल गाठण्याकरता आयर्लंडविरूद्ध विजय मिळवणं आवश्यक होतं.. अखेर इटलीने महत्त्वाच्या मॅचमध्ये आपल्या खेळाचा दर्जा सुधारत लीग स्टेजमधील एकमेव विजयाची नोंद केली...

 

या मॅचपुर्वी लीगमधील दोन्ही मॅचेस गमावणा-या आयर्लंडने इटलीला सुरूवातीपासूनच जोरदार टक्कर दिली...विजय आवश्यक असणा-या इटलीची अनेक आक्रमणं आयरिश गोलकीपर गिव्हनने लिलया थोपवली...पण अखेर फर्स्ट हाफच्या 35व्या मिनीटाला इटलीला आयरिश डिफेंस भेदण्यात यश आलं...पिअर्लोने मारलेल्या कॉर्नर किकला ऍन्टोनिओ कॅसानोने हेडरद्वारे गोलपोस्टचा रस्ता दाखवला आणि इटलीने फर्स्ट हाफमध्ये 1-0ने आघाडी घेतली... पुन्हा पराभव नजरेसमोर दिसणा-या आयर्लंडने सेकंड हाफमध्ये अटॅकवर अधिकाधिक भर देत इटलीच्या डिफेंसवर दबाव निर्माण केला...पण इटलीचा अनुभवी गोलकीपर बफॉनने त्यांचे गोल करण्याचे प्रयत्न हाणून पाडले...दरम्यान मॅचच्या 89 व्या मिनीटाला आयर्लंडच्या केथ ऍन्ड्रयुला, पिअर्लोला चुकीच्या पद्धतीने अडवल्यामुळे मॅचमधील दुसरं यलो कार्ड मिळालं...आणि ऍन्ड्रयुला रेड कार्ड घेऊन मैदानाबाहेर जावं लागलं...

 

रेफ्रीच्या या निर्णयामुळे नाराज झालेला ऍन्ड्रयु रागाच्या भरात मैदानाबाहेर पडला...आयर्लंडसमोर अखेरच्या मिनीटात 10 प्लेअर्स घेऊन खेळण्याचं आव्हान उभं राहिलं...मिळालेल्या याच संधीचा फायदा उचलत मॅचच्या पुर्वार्धात डग आऊटमध्ये बसाव्या लागलेल्या बालोटेलीने, 90व्या मिनीटाला पेनल्टी किकवर आयरिश टीमचा डिफेंस भेदत गोल केला...आणि इटलीने आपली विजयी आघाडी 2-0ने वाढवली...ग्रुपमध्ये 5 पॉईंट्ससह सेकंड पोझिशनवर आलेल्या इटलीसमोर क्वार्टर फायनलमध्ये, ग्रुप डीमध्ये टॉपवर असणा-या टीमचं आव्हान असणार आहे...