भूपती-सानिया फ्रेंच ओपनच्या फायनलमध्ये

महेश भूपती आणि सानिया मिर्झा या टेनिस जोडीने फ्रेंच ओपनमध्ये मिक्स डबल्सच्या फायनलमध्ये धडक मारली आहे. सेमी फायनलमध्ये भूपती-सानियाने 6-4, 6-2 ने विजय मिळवत फायनल गाठली.

Updated: Jun 7, 2012, 08:27 PM IST

www.24taas.com, पॅरिस

महेश भूपती आणि सानिया मिर्झा या टेनिस जोडीने फ्रेंच ओपनमध्ये मिक्स डबल्सच्या फायनलमध्ये धडक मारली आहे. सेमी फायनलमध्ये भूपती-सानियाने 6-4, 6-2 ने विजय मिळवत फायनल गाठली.

 

सातव्या सीडेड भूपति-सानियाने अनसीडेड जेलिना-डॅनिएल जोडीला एक तास दहा मिनिटांमध्ये पराभूत केल. ऑस्ट्रेलिया ओपनमध्ये विजेतेपद पटकावलेल्या भूपति-सानिया यांनी आता दुस-या विजेतेपदाकडे ही वाटचाल केलीय.

 

 

नदालने गाठला ५० विजयाचा टप्पा

दरम्यान, फ्रेंच ओपनच्या क्वार्टर फायनलमध्ये स्पॅनिअर्ड राफायल नादालने त्याच्याच देशाच्या 12व्या सीडेड निकोलस अल्मगारोचा तीन सेटमध्ये पराभव करत...दिमाखात सेमीफायनल गाठली...

 

अल्मगारोविरूद्ध राफाने विजय मिळवत रोलँड गॅरोसवरील 50 विजयांचा टप्पाही गाठला...सेमी फायनलमध्ये राफाची गाठ पडणार आहे ती डेव्हिड फेररशी...

 

 

फ्रेंच ओपनच्या क्वार्टर फायनलमध्ये सेकंड सीडेड राफाएल नादालने स्पेनच्याच 12व्या सीडेड निकोलस अल्मगारोचा पराभव करत, रोलँड गॅरोसवरील 50व्या विजयाची नोंद केली...फ्रेंच ओपनचं सातव्यांदा जेतेपद जिंकण्यासाठी क्ले कोर्टवर उतरलेल्या राफाने अल्मगारोचा 7-6, 6-2, 6-3 ने पराभव केला....रोलँड गॅरोसवर 50 पेक्षा अधिक मॅचेस जिंकणारा नादाल सहावा टेनिस प्लेअर ठरलाय...

 

 

रोलँड गॅरोसवर याआधी गुलेर्मो विलाजने 56 विजय मिळवले आहेत...तर नादालचा कट्टर प्रतिस्पर्धी असणा-या रॉजर फेडररने 54 मॅचेस जिंकल्या आहेत...इवान लेंडल च्या नावे 53 विजयांची नोंद असून...आंद्रे आगासी आणि निकोला पिट्रांगेलीच्या नावे अनुक्रमे 51 आणि 50 क्ले कोर्ट विजयाची नोंद आहे...नादालने अल्मागारोचा पराभव करताना बियॉन बोर्गच्या 49 विजयांना मागे टाकत रोलंड गॅरोसवरील 50 व्या विजयाची नोंद केली...

 

 

टेनिसच्या चारंही ग्रँड स्लॅममधील सर्वाधिक कठीण असं समजल्या जाणा-या फ्रेंच ओपनमध्ये आणखी एक विक्रम नावावर करण्यासाठी राफा सज्ज झालाय...फ्रेंच ओपनमध्ये सलग आठव्या वर्षी हजेरी लावणा-या राफाएल नादालने याआधी सहावेळा फ्रेंच ओपनचं जेतेपद जिंकत, बियॉव बोर्गच्या विक्रमाशी बरोबरी केली होती...त्यामुळे यावर्षी सातव्यांदा फ्रेंच ओपनचं जेतेपद मिळवून सर्वाधिक वेळा फ्रेंच ओपन जिंकणारा प्लेअर बनण्याचा रेकॉर्ड करण्याचा नादालचा इरादा आहे...क्वार्टर फायनलमध्ये नादालपुढे त्याच्याच देशाच्या 12 व्या सीडेड निकोलस अल्मगारोचं आव्हान होतं...पण नादालने पहिला सेट 7-6 ने जिंकत..दुस-या सेटमध्येही 3-1 ने आघाडी घेतली...आणि 45 मिनीटात दुसार सेटही नावावर केला...

 

 

नादालने 24 सर्व्हिस पॉईंटसपैकी 18 पॉईंट्स मिळवले...त्यातील 10 हिट्स या विनर ठरल्या...मॅचदरम्यान अल्मगारोने खेळताना 13 एरर्सही केले....अखेर नादालने तीन सेट्समध्ये बाजी मारत सेमीफायनलमध्ये आपली जागा फिक्स केली...सेमीमध्ये राफाची गाठ पडणार आहे ती स्पेनच्याच डेव्हिड फेररशी...दुखापतीतून सावरल्यानंतर नादालने क्ले कोर्टवर तीन टूर्नामेंट्सची जेतेपदं मिळवली आहेत...त्यामुळे नादालची सध्याची घोडदौड पाहता यावेळीही नादाल फ्रेंच ओपन गाजवणार एवढं नक्की....