मायकल फेल्प्स : ऑल टाईम ग्रेट

ऑलिम्पिकमध्ये अमेरिकेचा स्टार स्विमर मायकल फेल्प्स क्रीडाप्रेमींसाठी सेन्टर ऑफ अॅट्रॅक्शन ठरणार आहे. २००८ बिजिंग ऑलिम्पिकमध्ये त्यानं स्विमिंगच्या आठ इव्हेंट्समध्ये गोल्ड मेडल पटकावत नवा इतिहास रचला होता. आता २०१२ लंडन ऑलिम्पिकमध्ये त्याच्यासमोर बीजिंग ऑलिम्पिकची पुनरावृत्ती करण्याचं आव्हान असणार आहे.

Updated: Jul 25, 2012, 01:12 PM IST

www.24taas.com 

 

ऑलिम्पिकमध्ये अमेरिकेचा स्टार स्विमर मायकल फेल्प्स क्रीडाप्रेमींसाठी सेन्टर ऑफ अॅट्रॅक्शन ठरणार आहे. २००८  बिजिंग ऑलिम्पिकमध्ये त्यानं स्विमिंगच्या आठ इव्हेंट्समध्ये गोल्ड मेडल पटकावत नवा इतिहास रचला होता. आता २०१२ लंडन ऑलिम्पिकमध्ये त्याच्यासमोर बीजिंग ऑलिम्पिकची पुनरावृत्ती करण्याचं आव्हान असणार आहे.

 

मायकल फेल्प्स... वर्ल्ड चॅम्पियन स्विमर आणि ऑलिम्पिक गोल्ड मेडलिस्ट... अमेरिकेचा हा स्विमर स्विमिंगच्या दुनियेवर गेल्या एका दशकापासून  राज्य करतोय. ऑलिम्पिकच्या प्रत्येक इव्हेंटवर त्याचाच दबदबा असतो. ऑलिम्पिकमध्ये त्याचं राज्य खालसा करण्याची हिमंत कोणताही स्विमर करु शकलेला नाही. आपल्या असमान्य कामगिरीच्या जोरावर त्यानं स्विमिंगच्या जगतामध्ये आपली दहशत निर्माण केली आहे. त्याचा जन्म हा केवळ रेकॉर्ड्स करण्यासाठी आणि मेडल्सची कमाई करण्यासाठी झालाय असं म्हटलं तर काहीच वावग ठरणार नाही. त्यामुळेच त्याला स्विमिंगच्या दुनियेत 'किंग ऑफ पूल' म्हटलं जातं. आता लंडन ऑलिम्पिकमध्ये मायकल फेल्प्स २००८ ची पुनरावृत्ती करण्यास सज्ज झाला आहे.

 

फेल्प्सकडे आहे मेडल्सची यादी

२००२ ‘पॅन पॅसिफिक गेम्स’मध्ये त्यानं तीन गोल्ड आणि दोन सिल्व्हर मेडल्स पटकावत स्विमिंगच्या दुनियेत दिमाखात एन्ट्री घेतली. त्यानंतर २००३ च्या ‘वर्ल्ड चॅम्पियनशिप’मध्ये त्यानं चार गोल्ड आणि दोन सिल्व्हर मेडल्सची कमाई केली. त्यानंतर क्रीडा जगताच्या मेगा इव्हेंटमध्ये अर्थातच ऑलिम्पिक २००४ मध्ये त्यानं सहा गोल्ड आणि दोन सिल्व्हर मेडल्स पटकावत साऱ्यांचच लक्ष वेधून घेतलं. २००५ वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये त्यानं पाच गोल्ड आणि एक सिल्व्हर मेडल पटकावलं. २००६ ‘पॅन पॅसिफिक’मध्ये त्यानं पुन्हा एकदा पाच गोल्ड आणि एका सिल्व्हर मेडल्सवर कब्जा केला. २००७ ‘वर्ल्ड चॅमपियशिप’मध्ये त्यानं सात गोल्ड मेडल मिळवले. त्यानंतर २००८ बिजिंग ऑलिम्पिकमध्ये त्यानं आठही इव्हेंटमध्ये रेकॉर्डब्रेक कामगिरीसह आठ गोल्ड मेडल्स पटकावण्याची किमया साधली. २००९ ‘वर्ल्ड चॅम्पियनशिप’मध्ये त्यानं पाच गोल्ड मेडल आणि एक सिल्व्हर मेडल जिंकलं. २०१० ‘पॅन पॅसिफिक गेम्स’मध्ये त्यानं पाच गोल्ड मेडलची कमाई केली. त्यानंतर २०११ वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये चार गोल्ड,  दोन सिल्व्हर आणि एक ब्राँझ मेडल मिळवलं.

 

अमेरिकेच्या या ऑल टाईम ग्रेट स्विमरवर लंडन ऑलिम्पिकमध्ये साऱ्यांच्याच नजरा असणार आहेत. अमेरिकेच्याच मार्क स्पीड्झ यांचा रेकॉर्ड मोडित काढणाऱ्या फेल्प्सनं या ऑलिम्पिकमध्येही पुन्हा एकदा आठ गोल्ड मेडल्स पटकावण्याची किमया साधली तर काहीच आश्चर्य वाटायला नको.

 

.