इंडिया टॉस 'विन', सचिन करणार शतकी 'इनिंग'?

एशिया कपमध्ये भारताने टॉस जिंकला आहे. टॉस जिंकून भारताने पहिली बॅटींग घेतली आहे. सचिन महाशतक आज करणार का? याकडेच साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. तसंच बांग्लादेश सोबत असणऱ्या थोड्या सोप्या मॅचमध्ये शतक करण्यासाठी सचिनही नक्कीच तयार असेल.

Updated: Mar 16, 2012, 04:57 PM IST

www.24taas.com, मीरपूर

 

एशिया कपमध्ये भारताने टॉस जिंकला आहे. टॉस जिंकून भारताने पहिली बॅटींग घेतली आहे. सचिन महाशतक आज करणार का? याकडेच साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. तसंच बांग्लादेश सोबत असणऱ्या थोड्या सोप्या मॅचमध्ये शतक करण्यासाठी सचिनही नक्कीच तयार असेल. भारतीय टीममध्ये आज दोन बदल करण्यात आले आहेत. रविंद्र जडेजा आणि अशोक डिंडा यांना बांग्लादेश विरूद्ध संधी देण्यात आली आहे.

 

लाईव्ह स्कोअर जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

 

भारत-बांग्लादेश यांच्यात आज लढत होत आहे. आशिया चषकात सलग दुसऱ्या विजयाची नोंद भारत करणार का याची उत्सुकता आहे. त्याचबरोबर मास्टर ब्लास्टरचे महाशतक होणार का, याचीही उत्कंठा असणार आहे. बांग्लादेशला स्पर्धेतून बाहेर पाठवण्याचा डबल धमाका उडवण्यासाठी भारतीय टीम सज्ज झाली आहे.

 

बांग्लादेशसमोर  भारतीय संघाचे आज आव्हान असणार आहे. यजमान बांग्लादेशला घरच्या मैदानावर बलाढ्य भारताच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. सलामी सामन्यातील पराभवामुळे बांग्लादेशचे स्पर्धेतील स्थान अडचणीत आले आहे. शुक्रवारी भारतविरुद्धच्या सामन्यात बांग्लादेशला विजयाची आवश्यकता आहे.

 

श्रीलंकेला नमवून पुरागमन करणारा भारतीय संघाचा फॉर्म कायम राहण्याची शक्यता आहे. श्रीलंकेपाठोपाठ बांग्लादेशला पराभवाची धूळ चारण्यासाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे.  पुनरागमन करणाऱ्या इरफानने श्रीलेंकविरुद्ध घातक गोलंदाजीचे प्रदर्शन केले. त्यामुळे बांगलादेशविरुद्ध इरफानच्या धारदार गोलंदाजीचा फायदा घेण्यावर टीम इंडियाचा भर असणार आहे. तसेच त्याला साथ देण्यासाठी प्रवीण कुमार, आर.अश्विन ही जोडीदेखील प्रयत्नशील राहणार आहे.

 

इंडिया : 6/0 (ओव्हर 2.0)

बांग्लादेश : 0/0 (ओव्हर 0.0)