पराभवाचे जिणे, टीम इंडिया फक्त 'उणे'

ब्रिस्बेन येथील श्रीलंकेविरूद्ध तिसऱ्या वनडेमध्ये भारताचा ५१ रनने पराभव झाला. श्रीलंकेने भारताला ४५ ओव्हरमध्येच गुंडाळले. भारत फक्त २३८ रन पर्यंतच मजल मारू शकला.

Updated: Feb 21, 2012, 05:11 PM IST

www.24taas.com, ब्रिस्बेन

 

ब्रिस्बेन येथील श्रीलंकेविरूद्ध तिसऱ्या वनडेमध्ये भारताचा ५१ रनने पराभव झाला. श्रीलंकेने भारताला ४५ ओव्हरमध्येच गुंडाळले. भारत फक्त २३८ रन पर्यंतच मजल मारू शकला. श्रीलंकेने टॉस जिंकून प्रथम बॅटींग केली. भारतासमोर २९० रनचं आव्हान ठेवलं होतं. पण भारतीय बॅट्समन नेहमीप्रमाणे ढिसाळ बॅटींग करून आऊट झाले.

 

लाईव्ह स्कोअर जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

 

भारतातर्फे विराट कोहलीने सर्वाधिक म्हणजे ६६ रन केले तर श्रीलंकेकडून परेराने सर्वाधिक म्हणजे ४ विकेट घेतले. भारत या मॅचमध्ये देखील काहीच प्रभावी कामगिरी करू शकला नाही. आता भारताला शेवटच्या दोनही मॅच जिंकणं गरजेच आहे. तरचं भारत फायनल गाठू शकेल.

भारत वि. श्रीलंका सुरू असलेल्या वनडे मॅचमध्ये टीम इंडियाचे बॅट्समन पुन्हा एकदा फ्लॉप ठरले आहेत. आतापर्यंत भारताच्या ७ विकेट गेल्या आहेत. गेल्या काही मॅचमध्ये प्रमुख बॅट्समननी साफ निराशाच केली आहे. आजच्या मॅचमध्येही भारतीय बॅट्समन फारशी चमकदार कामगिरी करू शकले नाही. विराट कोहली चांगली खेळी केली. त्याने ६६ रनपर्यंत मजल मारली. पण त्याला मोठ्या खेळीत रूपांतर करता आले नाही.

 

कोहली आऊट झाल्यानंतर, रविंद्र ज़डेजा, आणि पार्थिव पटेल हे सुद्धा लगेचच तंबूत परतले. भारताला जिकंण्यासाठी ५२ बॉलमध्ये ६८ रनची गरज आहे. आणि अजुनही ३ विकेट बाकी आहेत इरफान पठाण आणि आश्विन खेळत असल्याने अजुनही मॅच जिंकण्यासाठीचे प्रयत्न मात्र सुरू आहेत.

 

ब्रिस्बेन येथे सुरू असलेल्या वन डे मॅचमध्ये भारताच्या आघाडीच्या बॅट्समननी पूर्णपणे निराशा केली. भारतीय बॅट्समन अत्यंत चुकीचे फटके मारून आऊट झाले. मलिंगाने सेहवाग साठी योग्य प्रकारे जाळं पसरवलं होत, त्यात सेहवाग आपसूक सापडलाच पहिल्याच ओव्हरमध्ये सेहवागने मलिंगाचा शॉर्टपिच बॉलला थॅर्डमॅनवरून टोलवण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा अगदी सोपा कॅच कुलशेखरांने पकडला सेहवाग शून्यावर आऊट झाला.

 

तर नेहमीप्रमाणे सचिनने निराशा केलीच. तो २२ रनवर आऊट झाला. तर गंभीर देखील जास्त वेळ टीकू शकला नाही. त्यामुळे तीन महत्त्वाचे बॅट्समन झटपट आऊट झाल्याने भारतासमोरचं आव्हान खडतर भासू लागलं आहे. रैना २१ आणि कोहली ३५ रनवर खेळत आहे. भारताला जिंकण्यासाठी आणखी २४ ओव्हरमध्ये १६७ रनची गरज आहे.

 

भारत वि. श्रीलंका सुरू असलेल्या तिसऱ्या वन डे मॅचमध्ये श्रीलंकेने २८९ रनचा डोंगर भारतासमोर उभारला आहे. त्यामुळे आता भारत हे आव्हान पार करणार की, पुन्हा एकदा ढेपाळणार हे लवकरच कळेल. श्रीलंकेने सुरूवात चांगली केली. मात्र त्यांचे तीन बॅट्समन झटपट आऊट झाल्यानंतर ते पुन्हा एकदा दबावाखाली आले होते.

 

पण भारतीय बॉलर तो दबाव कायम ठेवण्यात यशस्वी झाले नाही. थिरीमन्ने यांने सर्वाधिक ६२ रन केले. तर अँजेलो मॅथ्य़ूसने ३७ बॉलमध्ये ४९ रन केले. त्याने शेवटच्या दहा ओव्हरमध्ये चांगली फटकेबाजी केली. त्यामुळे श्रीलंका इतक्या मोठ्या स्कोरपर्यंत मजल मारू शकली.

 

भारत वि. श्रीलंका सुरू असलेल्या वन डे मॅच मध्ये श्रीलंकेने चांगली सुरूवात केली, मात्र भारतीय बॉलरने झोकात पुनरागमन करत श्रीलंकेच्या खेळाडूंना बॅकफूटवर जाण्यास भाग पाडलं आहे. जयवर्धने आणि दिलशाना यांनी सुरूवातीलाच टीम इंडियावर प्रहार करण्यास सुरवात केली. श्रीलंकेच्या आतापर्यंत ४ विकेच मिळविण्यात भारतीय बॉलरांना यश आलं आहे

 

जयवर्धने ४५ तर दिलशान ५१ रनची खेळी करून टीमला चांगली सुरूवात दिली पण हे दोघं आऊट झाल्यावर कॅप्टन संगकारा देखील लगेचच माघारी परतला. त्यामुळे भारताने आता पुन्हा मॅचवर पकड मिळविण्याचा प्रयत्न करीत आहे. इरफान पठाण, २ विकेट घेतल्या तर उमेश यादव आणि आर. आश्विन यांनी प्रत्येकी १-१ विकेट घेतल्या. इरफान पठाणने जयवर्धनेला सेहवागकरवी आऊट केले तर घातक दिलशानला आश्विनने आपलं शिकार बनवलं.

 

ब्रिस्बेन येथे भारत वि. श्रीलंका यांच्यातील तिसऱ्या वन