बांग्लादेशच्या पंतप्रधानांकडून सचिनचा गौरव

सचिन तेंडुलकर हा संपूर्ण भारतीय उपखंडाची शान आहे, असं वक्तव्य बांग्ला देशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी सोमवारी केलं. सचिन तेंडुलकरच्या महाशतकी खेळानंतर त्याला गनोभाबन या बांग्ला देशाच्या पंतप्रधान निवासस्थानी आमंत्रित करण्यात आले होते.

Updated: Mar 20, 2012, 09:55 AM IST

www.24taas.com, ढाका

 

"सचिन तेंडुलकर हा संपूर्ण भारतीय उपखंडाची शान आहे", असं वक्तव्य बांग्ला देशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी सोमवारी केलं.

 

सचिन तेंडुलकरच्या महाशतकी खेळानंतर त्याला गनोभाबन या बांग्ला देशाच्या पंतप्रधान निवासस्थानी आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना नी सचिनचे अभिनंदन केले. या प्रसंगी त्यांच्याबरोबर त्यांची धकटी बहिण शेख रिहाना, मुलगा साजिब वाज़ेद जॉय आणि मुलगी सायमा वाजेद पुतुल हे सचिनच्या स्वागतासाठी उपस्थित होते.

बांग्लादेशाने टीम इंडियावर मिळवलेल्या विजयाने आम्हाला खूप आनंद झाला आहे. पण, सचिन तेंडुलकरच्या शंभराव्या शतकाचाही आम्हाला अभिमान वाटतो. सचिन हा भारताचीच नव्हे, तर सपूर्ण उपखंडाचीच शान आहे. असं मत शेख हसीना यांनी व्यक्त केलं. याशिवाय त्यांनी सचिनला काही भेटवस्तूही दिल्या.

सचिन तेंडुलकरला याविषयी विचारलं असता तो म्हणाला, “बांग्ला देशच्या पंतप्रधानांशी बोलताना एक गोष्ट जाणवली, ती म्हणजे त्या क्रिकेटच्या खूप मोठ्या फॅन आहेत. त्यांनी मला आपल्या निवासस्थानी बोलवून माझा गौरव केला, हा मी माझा बहुमान समजतो. यामुळे मला अधिकाधिक खेळण्याची ऊर्जा मिळते.”