ऑस्ट्रेलियाचा तेज तर्रार बॉलर ‘ब्रेट ली’नं आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला आहे. ली यानं २०१० मध्ये टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली होती आणि आता पायाच्या दुखापतीमुळे त्याला वन-डे क्रिकेटलाही अलविदा करावा लागलाय. ऑस्ट्रेलियाच्या युवा बॉलर्सचा टीममध्ये मार्ग मोकळा करण्यासाठीच आपण क्रिकेटला गुडबाय करत असल्याचं ली नं सांगितलंय.
ऑस्ट्रेलियन स्पिड गन ब्रेट लीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केलाय. १६० किमीच्या वेगानं बॉल टाकणाऱ्या या ऑस्ट्रेलियाच्या फास्ट बॉलरनं क्रिकेटविश्वात आपली वेगळी दहशत निर्माण केली होती. ‘ग्रँडफादर ऑफ न्यू जनरेशन ऑफ फास्ट बॉलर्स’ म्हणून ब्रेट ली क्रिकेट जगतामध्ये ओळखला जायचा. मात्र, आता क्रिकेटविश्वाला या फास्ट बॉलरचा जलवा पुन्हा पाहाता येणार नाही. क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये त्यानं ७१८ विकेट्स घेतल्या होत्या. टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या बॉलर्समध्ये तो १० व्या क्रमांकावर होता.
ब्रेट ली नं २२१ वन-डे मॅचेसमध्ये ४.७६ च्या इकॉनॉमी तब्बल ३८० विकेट्स घेतल्या आहे. मेलबर्नला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध २२ रन्स देत ५ विकेट्स ही त्याची वनडेतील सर्वोत्तम कामगिरी ठरलीय. लीनं ७६ टेस्मध्ये ३१० विकेट्स घेतल्या आहेत. वेस्ट इंडिजविरुद्ध ३० रन्स देत घेतलेल्या ५ विकेट्स ही त्याची टेस्ट क्रिकेटमध्ये इनिंगमधील सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे. ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटमधील ली सर्वोत्तम फास्ट बॉलर्सपैकी एक आहे. आता, त्याच्या निवृत्तीमुळे आगमी टी-२० वर्ल्ड कपमध्ये कांगारुंना त्याची कमतरकता निश्चितच जाणवणार.