भारताची अवस्था बिकट, जाताहेत विकेट

सिडनी टी-२० मध्ये भारताची अवस्था बिकट होत चालली आहे. १० ओव्हरमध्ये ७० रन केले मात्र त्याबदल्यात ५ विकेट गमावल्या. सेहवाग ४ रनवर आऊट झाला तर त्यानंतर गंभीर २० रन करून परतला तर कोहलीने काहीवेळ चांगली फटकेबाजी केली पण ब्रॅड हॉजने त्याला २१ रनवर कॅचआऊट केल.

Updated: Feb 2, 2012, 07:46 PM IST

www.24taas.com, सिडनी

 

सिडनी टी-२० मध्ये भारताची अवस्था बिकट होत चालली आहे. १० ओव्हरमध्ये ७० रन केले मात्र त्याबदल्यात ५ विकेट गमावल्या. सेहवाग ४ रनवर आऊट झाला तर त्यानंतर गंभीर २० रन करून परतला तर कोहलीने काहीवेळ चांगली फटकेबाजी केली पण ब्रॅड हॉजने त्याला २१ रनवर कॅचआऊट केल. त्यानंतर आलेला रोहित शर्मा भोपळाही फोडू शकला नाही. आणि पहिल्याच बॉलमध्ये हस्सीने त्याचा त्रिफळा उडवला.

 

त्यानंतर कॅप्टन धोनी सोबत रैना काही धावांची भर घातली. मात्र तो १४ रनवर असताना ख्रिस्टनने त्याच्या दांड्या गुल केल्या. आता भारताला ७ ओव्हर मध्ये ९५ रनची गरज आहे. धोनी ८ रनवर आणि रविंद्र जडेजा २ वर खेळतो आहे. त्यामुळे या मॅचमध्ये विजयी होण्यासाठी धोनीला धुवाँधार फलंदाजी करावी लागणार आहे.

 

भारत – ऑस्ट्रेलिया पहिल्या टी-२० मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाने भारतासमोर १७२ रनचं आव्हान ठेवलं  मात्र सुरवातीलाच भारताला पहिला धक्का बसला आहे. गंभीर सोबत ओपनिंगला आलेल्या सेहवागला ब्रेट लीने पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. फक्त ४ रन करून तो बाद झाला. सेहवागला ब्रेट लीने हस्सीकरवी कॅचआऊट केलं. पण त्यानंतर आलेल्या कोहलीने काही चांगले फटके मारले. भारताने ३ ओव्हरमध्ये २८ रन केले.

 

मॅचचा LIVE स्कोर जाणून घेण्यासाठी क्लिक करा.

 

दरम्यान यापूर्वी सिडनीतील पहिल्या टी-२० मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाने उत्कृष्ट खेळ करत भारतासमोर १७२ रन्सच आव्हान ठेवलं आहे. धडाकेबाज सुरवात केली. त्यांनी भारतीय बॉलर्स निष्प्रभ ठरले. ऑस्ट्रेलियाने चार विकेटच्या मोबदल्यात १७१ रनपर्यंत मजल मारली. त्यामुळे आता भारताला मॅच जिंकण्यासाठी चांगल्या सुरवातीची गरज आहे. मॅथ्यू वेड यांने ७२ रन आणि हस्सीने धडाकेबाज ४२ रन केल्या.

 

सि़डनी पहिल्या टी-२० मॅचमध्ये पावसाने खोडा घातला होता. मात्र काही वेळाने पुन्हा एकदा मॅचला सुरवात झाली. सुरवातीला धडाकेबाज वेड यांने ४३ बॉल्स मध्ये ७२ रन केले. पण रैनाने त्याला लवकरच बाद केले. आणि त्यानंतर हस्सीने देखील चांगली बॅटींग केली.

 

भारत- ऑस्ट्रेलिया सिडनीतील टी-२०मॅचमध्ये पावसाने व्यत्यय आणला आहे. त्याआधी ऑसी बॅट्समनने तुफानी बॅटींग करून टीम इंडिया समोर तगडं आव्हान ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. पावसाने व्यत्यय आणण्यापूर्वी ऑस्ट्रेलियाने १४.४ ओव्हरमध्ये १३१ रन्सपर्यंत मजल मारली आहे. तर त्याबदल्यात फक्त दोन विकेट गमावल्या.

 

वेड याने  फक्त ४१ बॉल्समध्ये ७० रन काढले त्यात त्याने ४ फोर आणि ३ सिक्स हाणले, भारतीय गोलंदाजांपैकी राहुल शर्मा आणि विनयकुमार यांनी प्रत्येकी १ – १ विकेट घेतले. पण आर अश्विन, प्रविण कुमार, रविंद्र जडेजा यांच्या बॉलिंगवर ऑसी बॅट्समनने अक्षऱश धावा लुटल्या. सामना थांबविण्यात आला तेव्हा  वेड ७० रन आणि डेव्हिड हस्सी १७ रनवर खेळत होते.

 

सिडनीत भारत – ऑस्ट्रेलिया मध्ये पहिल्या टी-२० आज सुरवात झाली. नाणेफेक जिंकून आज प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय कॅप्टन धोनीने घेतला. सिडनीतील वातावरण पाहता भारतीय बॉलर्सला वातावरणाचा फायदा मिळावा यासाठी भारताने पहिले फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला होता.  मात्र डेव्हिड वार्नर आणि वेड यांनी चांगली सुरवात केली.

 

मात्र विनयकुमारने डेव्हिड वॉर्नरला सुरेश रैना करवी कॅचआऊट करून त्याचा अडसर दूर केला. वॉर्नरने १४ बॉलमध्ये २१ रन केले त्यात १ फोर आणि २ सिक्सचा समावेश होता. पण त्यानंतर आलेल्या ब्रटला सोबत घेऊन वेड यांने धडाकेबाज फटकेबाजी केली. पण ब्रट १७ रन्सवर असताना राहुल शर्माने त्यांचा बळी घेतला. वेड मात्र अजूनही चांगली बॅटींग करत आहे. त्याने ३६ बॉलमध्ये आपले अर्धशतक झळकावले आहे. त्यात ४ फोर आणि २ सिक्सचा समावेश आहे.

 

दहा ओव्हर नतंर ऑस्ट्रेलियाने ८० रन पर्यंत मजल मारली होती. त्यामुळे आता ऑस्ट्रेलिया मोठी धावसंख्या उभारण्याचा दृष्टीने प्रयत्न करेल. तर मात्र भारतीय बॉलर्सला त्यांना कमीत कमी रनमध्ये रोखणाचं आव्हान असणार आहे.

&nb