तुम्हाला दिवाळीत नातेवाईक, शेजाऱ्यांकडून फराळ मिळाला असेल ना? घरात इतका फराळ झाला आहे की नेमकं काय करावं असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. आता हा फराळ खराब व्हायच्या संपवण्याचं आव्हानही तुमच्यासमोर असेल. यामुळेच आई-बायकोही रोज सकाळी नाश्त्यात हाच फराळ खायला लावते. काहीजण हा फराळ सामान्य पद्धतीने खातात तर काहीजण मात्र यासाठी वेगळी पद्धत अवलंबतात. एका व्लॉगरने व्हिडीओ शेअर केला आहे ज्यामध्ये तो दिवाळीचा फऱाळ चहामध्ये बुडवून खाताना दिसत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाला असून नेटकरी त्यावर व्यक्त होत आहेत.
@hungryexplorerss या अकाऊंटवर हा रील शेअर करण्यात आला आहे. यामध्ये व्लॉगर सुरुवातीला चकली चहात बुडवून खाताना दिसत आहे. यानंतर तो पोहा चिवडा चहामध्ये मिसळून खातो. या दोन्ही गोष्टी दिवाळीच्या फराळातील मुख्य पदार्थांपैकी आहेत. दिवाळीत एकमेकांना दिल्या जाणाऱ्या फराळात हे दोन पदार्थ हमखास असतात.
या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आलं आहे की, "आता पुढील काही दिवस हाच नाश्ता". यानंतर पुढे हसतानाचा, हार्ट इमोजी शेअर केली आहे.
हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला असून त्याला 3.6 मिलियनपेक्षा जास्त व्ह्यू मिळाले आहेत. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी अनेक कमेंट्स केल्या आहेत. अनेकांनी ही महाराष्ट्रात सामान्य बाब असल्याचं म्हटलं आहे, तर काहींनी चिवडा मिसळल्याने आता हा मसाला चहा झाल्याची कमेंट केली आहे. काहींनी कमेंट करत आपल्याला चहासोबत काय आवडतं हे सांगितलं आहे.
"मसाला चहाचा खरा अर्थ."
"चहा-करंजी सर्वोत्तम कॉम्बो आहे."
"मी शंकरपाळी सोबत चहा करून पाहिला आहे, पण चिवड्या सोबत, हा वेगळा कॉम्बो आहे."
"चिवडा झाल्यावर तू मसाला चहा कर."
"तुम्ही चायमध्ये लाडू बुडवू शकता"
"चकलीसोबत चहा माझी आवडती गोष्ट आहे"
"मी हा प्रयत्न कधीच केला नाही"
तुम्ही असा फराळ कधी खाल्ला आहे का? तुम्हाला चहासोबत नेमकं काय खायला आवडतं?