मी रिटायर होणार.. धोनी

भारताचा कॅप्टन महेंद्रसिंग धोनीनं टेस्ट क्रिकेटमधून निवृत्तचे संकेत दिले आहेत. पर्थ टेस्टपूर्वी धोनीनं हा खुलासा केला आहे. २०१३ मध्ये क्रिकेटमधील एक फॉरमॅट सोडण्याचे संकेत धोनीने दिले आहेत.

Updated: Jan 12, 2012, 04:13 PM IST

www.24taas.com, पर्थ

 

भारताचा कॅप्टन महेंद्रसिंग धोनीनं टेस्ट क्रिकेटमधून निवृत्तचे संकेत दिले आहेत. पर्थ टेस्टपूर्वी धोनीनं  हा खुलासा केला आहे. २०१३ मध्ये क्रिकेटमधील एक फॉरमॅट सोडण्याचे संकेत धोनीने दिले आहेत. २०१५ वर्ल्ड कपमध्ये खेळण्यासाठी क्रिकेटचा एक फॉरमॅट सोडावा लागेल.  असं महेंद्रसिंग धोनी याने म्हंटल आहे. मात्र याबाबत २०१३ मध्ये याबाबत निर्णय घेवू असंही त्यानं सांगितलं आहे.

 

माहीने टेस्ट क्रिकेटमधून निवृत्तीचे संकेत दिले आहेत,  माही लवकरच  टेस्ट क्रिकेटला बाय-बाय  करणार आहे. टीम इंडियाचा करिश्माई कॅप्टन महेंद्र सिंग धोनी टेस्टमधून निवृत्ती घेणार आहे. भारताला टेस्टमध्ये नंबर वन स्थानापर्यंत पोहचवणाऱ्या माहीनं पर्थ टेस्टपूर्वीच टेस्ट क्रिकेटला बाया-बाय करण्याचे संकेत दिले आहेत. माहीला २०१५ वर्ल्ड कप खेळण्याची इच्छा आहे. मात्र क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमुळे आपल्यावर ताण पडतं असल्याचंही त्यानं सांगितलं आहे. त्याकरताच आपल्याला क्रिकेटमधील एक फॉरमॅट सोडावा लागणार असल्याचं म्हटलं आहे.

 

२०१५ वर्ल्ड कप खेळायचे असेल तर मला क्रिकेटमधील एक फॉरमॅट सोडावा लागणार असल्याचं माहीनं सांगितलं. मात्र याबाबत आताच सांगण कठिण आहे.  २०१३ सालच्या अखेरीस मी टेस्ट निवृत्तीबाबत निर्णय घेणार असल्याचही त्यानं स्पष्ट केलं.माहीच्या  कॅप्टनशिपमध्ये भारतानं वनडेत अविस्मरणीय कामगिरी केली आहे. टेस्टमध्ये त्याच्या कॅप्टनशिपमध्ये भारतानं अनेक विजय मिळवले आहेत. मात्र परदेशात गेल्या सहा टेस्टमध्ये त्याला सलग पराभवाला समोरं जावं लागलं आहे. ऑस्ट्रेलियात त्याच्या कॅप्टनशिपवरही टीका होते आहे. त्यात वीरूसोबत वादाची चर्चा सुरु असताना धोनीनं निवृत्तीचे संकेत देत बाऊंसरच टाकला.

 

 

भारताचा कॅप्टन महेंद्रसिंग धोनीनं टेस्ट क्रिकेटमधून निवृत्तचे संकेत दिलेय.पर्थ टेस्टपूर्वी धोनीनं  हा खुलासा केलाय. 2013 मध्ये क्रिकेटमधील एक फॉरमॅट सोडण्याचे संकेत दिलेय...

2015 वर्ल्ड कपमध्ये खेळण्यासाठी क्रिकेटचा एक फॉरमॅट सोडाव लागेल असल्याचं त्यानं म्हटलंय..मात्र याबाबत 2013 मध्ये याबाबत निर्णय घेवू असंही त्यानं सांगितलं...