मोटेरामध्ये टीम इंडियाचं 'माते'रं!

अहमदाबाद वनडे वेस्ट इंडिजनं जिंकलीय. विंडिजनं टीम इंडियावर १६ रन्सनी विजय मिळवला. वेस्ट इंडिजनं प्रथम बॅटिंग ५० ओव्हर्समध्ये २६० रन्स केले. सॅमीनं १७ बॉल्समध्ये ४१ रन्स आणि रसेलनं १८ बॉल्समध्ये ४० रन्सची तुफानी खेळी करताना विंडिजला २५० रन्सचा टप्पा पार करून दिला.

Updated: Dec 5, 2011, 05:11 PM IST

झी २४ तास वेब टीम, अहमदाबाद

अहमदाबाद वनडे वेस्ट इंडिजनं जिंकलीय. विंडिजनं टीम इंडियावर १६ रन्सनी विजय मिळवला. वेस्ट इंडिजनं प्रथम बॅटिंग ५० ओव्हर्समध्ये २६० रन्स केले. सॅमीनं १७ बॉल्समध्ये ४१ रन्स आणि रसेलनं १८ बॉल्समध्ये ४० रन्सची तुफानी खेळी करताना विंडिजला २५० रन्सचा टप्पा पार करून दिला.

२६१ रन्सच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात खराब झाली. सेहवाग आणि गंभीर शून्यावर पॅव्हेलियनमध्ये परतले...त्यानंतर मिडल ऑर्डरही झटपट आऊट झाल्यानं भारताची अवस्था ६ आऊट १०५ अशी बिकट झाली.एकीकडे विकेट जात असताना फॉर्मात असलेला रोहित शर्मानं एकाकी झुंज सुरुच होती.

रोहितन अश्विनसोबत ९१ रन्सची पार्टनरशिप करत भारताच्या विजयाच्या आशा कायम ठेवल्या..रोहितनं आकर्षक फटकेबाजी करताना भारताच्या विजयासाठी आटोकाट प्रयत्न केला...मात्र ९५ रन्सवर सॅमीनं रोहितला रन आऊट केलं...आणि विंडिजचा विजयाचा मार्ग सुकर केला..

अभिमन्यू मिथुननं थोडाफार प्रयत्न केला...अखेर कॅरेबियन टीम मिथूनला आऊट करत सीरिजमधील पहिल्या विजय मिळवला....