www.24taas.com, मुंबई
युवराज सिंगनं क्रिकेटच्या मैदानावर कायम स्वत:ला एक फायटर म्हणून सिद्ध केलं आहे. आपल्या कर्तुत्वावर तो प्रतिस्पर्धी टीमसाठी डोकेदुखी बनत आला आहे तर टीम इंडियासाठी तारणाहाराची भूमिका बजावत आला आहे. ट्यूमरच्या त्रासातून तो आता सावरला आहे. आता टीम इंडियामध्ये कमबॅक करण्याची तो वाट बघतोय.
टीम इंडियाचं 28 वर्षापासूनचं वर्ल्ड कप जिंकण्याच स्वप्न साकार करण्यात युवराज सिंगनं महत्त्वाची भूमिका बजावली होती. प्रतिस्पर्धी टीमला त्यानं आपल्या बॅटिंग आणि बॉलिंगच्या जोरावर चांगलाचा दणका दिला. मात्र, युवीनं वर्ल्ड कपदरम्यान आपल्याला होत असलेला त्रास चाहत्यांनापासून लपून ठेवला. कारण त्याला याच करोडों क्रिकेटप्रेमींच भारतानं वर्ल्ड कप जिंकंण्याच स्वप्न पूर्ण करायचं होतं. कठीण परिस्थितीचा सामना करणं ही युवराज सिंगची खरी ओळख आहे. मैदानात असो वा मैदानाबाहेर वाद आणि युवराज असं समीकरणचं बनलं आहे.
युवराजवर 11 वर्षांच्या क्रिकेट करिअरमध्ये पार्टीबॉयचा आरोपही झाला. तर कधी खेळाच्या प्रती असलेल्या त्याच्या वागण्याबाबत प्रश्न उपस्थित केले गेले. मात्र, त्यानं शांत राहात आपल्या बॅटनं मैदानावर याच उत्तर दिलं. फॉर्मवर प्रश्नचिन्ह उभ राहिलं. तर कधी टीममधून हकालपट्टीही करण्यात आली मात्र एका फायटरप्रमाणे त्यानं टीम इंडियामध्ये कमबॅक केलं. त्यानं स्वत: ला सिद्ध केलं आणि भारतासाठी मॅचविनरची भूमिकाही बजावली. युवराजला ओळखणारेही सांगतायत की, त्याला फार काळ टीमबाहेर ठेवणं शक्य नाही. त्यामुळे लवकरच युवी टीममध्ये एका फायटरप्रमाणे कमबॅक करेल अशी आशा त्याच्या चाहत्यांना आहे.