www.24taas.com, पल्लेकल
भारताने ५० षटकात ७ बाद २९४ धावा केल्या आहेत. गौतम गंभीर ८८ तर मनोज तिवारी ६५ धावांवर आऊट झाला. तर कर्णधार महेंद्रसिंग धोनीने ३८ चेंडून ५८ धावा कुटल्या.
मायक्रोमॅक्स कपमधील पाचव्या व अंतिम सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. सलामीचा फलंदाज वीरेंद्र सेहवाग जखमी असल्याने त्याला संघाबाहेर ठेवण्यात आले आहे. संघात तो नसल्याने अजिंक्य रहाणेला सलामीला पाठविण्यात आले होते. मात्र तो केवळ ९ धावा काढून परेराच्या गोलंदाजीवर पायचीत झाला. त्यानंतर त्याच्या जागेवर विराट कोहली खेळायला आला.
इऱफान पठाणने नाबाद २९ धावा केल्या तर आर अश्विन २ धावांवर नाबाद राहिला. विराट कोहली २३, सुरेश रैना शून्यावर, रहाणे ९ , आर शर्माने ४ धावा केल्या.