सचिनला भारतरत्न मिळायला हवं - BCCI

सचिनच्या अभिनंदनाचा ठराव विधानसभेत मंजूर झाला आहे. सचिनचा राष्ट्रपतींच्या हस्ते सत्कार करण्याची मागणी बहुतेक आमदारांनी केली आहे. तर दुसरीकडे सचिनला भारतरत्न मिळावं.

Updated: Mar 19, 2012, 03:17 PM IST

www.24taas.com, मुंबई

 

सचिनच्या अभिनंदनाचा ठराव विधानसभेत मंजूर झाला आहे. सचिनचा राष्ट्रपतींच्या हस्ते सत्कार करण्याची मागणी बहुतेक आमदारांनी केली आहे. तर दुसरीकडे सचिनला भारतरत्न मिळावं, यासाठी प्रयत्न सुरु असल्याचं काँग्रेसचे प्रवक्ते आणि बीसीसीआयचे पदादिकारी राजीव शुक्ला यांनी सांगितलं आहे.

 

३३ इनिंगच्या प्रदीर्घ संघर्षानंतर सचिनने बांग्लादेश विरूद्ध महाशतक ठोकले होते.. ‘महाशतक’ आजवर कोणीही न गाठलेला एक पल्ला सचिनने गाठला आणि त्यामुळेच सचिनच्या या आगळ्या वेगळ्या विक्रमाबद्दल विधानसभेत अभिनंदनाचा ठराव मांड्ण्यात आला आणि मंजूर देखील झाला.

 

वनडे आणि टेस्ट मिळून सचिनने १०० शतकांचा असा पल्ला गाठला. शतकांचा शतकवीर अशी बिरूदावली आज त्याला खऱ्या अर्थाने शोभते आहे. गेले वर्षभर तो एकही शतक करू शकला नव्हता, त्यामुळे त्याच्यावर टीका केली जात होती मात्र त्याने आपल्या बॅटने सगळ्यांच्या टीकेला उत्तर दिले.

 

सचिन तेंडुलकरने आजवर अनेक विश्वविक्रम आपल्या नावावर केले मात्र महाशतकाचा विश्वविक्रम त्याला गेले वर्षभर हुलकावणी देत होता. गेल्या वर्षी खेळलेल्या वर्ल्डकपच्या सामन्यात त्याने द. आफ्रिकेविरूद्ध शतक केलं होतं ते त्याचं ९९वं शतक होतं. १२ मार्च २०११ला सचिनने शेवटची सेंच्युरी केली होती.