एकनाथ खडसेंनी गड राखला, मुक्ताईनगर पंचायतीवर भाजपचा झेंडा

काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या हाती या निवडणुकीत काहीच लागलं नाही.

Updated: Jul 20, 2018, 07:30 PM IST
एकनाथ खडसेंनी गड राखला, मुक्ताईनगर पंचायतीवर भाजपचा झेंडा title=

जळगाव: माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर नगर पंचायतीवर अखेर भाजपचा झेंडा फडकला आहे. १७ पैकी १४ जागा भाजपने जिंकल्या आहेत. तर आणखी एका जागेवर भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवारानेच बाजी मारली. शिवसेना ३ जागांवर विजयी झाली. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या हाती या निवडणुकीत काहीच लागलं नाही. नगराध्यक्षपदी भाजपच्या नजमा तडवी १ हजार १७५ मतांनी निवडून आल्या. भाजप नेते एकनाथ खडसे यांच्या नेतृत्वाखाली मुक्ताईनगर शहराचा चेहरा मोहरा बदलू. असे आश्वासन यावेळी नवनियुक्त लोकनियुक्त नगराध्यक्षा नजमा तडवी यांनी दिले.