पहिल्यांदाच एसटी कर्मचाऱ्यांवर संपावर बोलले राज ठाकरे... म्हणाले

राज्यातील विविध मुद्द्यांवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे नाशिक येथे बोलत होते.

Updated: Dec 13, 2021, 02:11 PM IST
पहिल्यांदाच एसटी कर्मचाऱ्यांवर संपावर बोलले राज ठाकरे... म्हणाले title=

नाशिक: S.T कर्मचारी युनियन बाजूला सारून संप करीत आहेत. लोकांनी राज्याच्या कारभार तुमच्या हातात दिला आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी याबाबत बोलणे आवश्यक आहे. असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटले आहे. नाशिकमध्ये राज्यातील विविध मुद्द्यांवर पत्रकारांशी बोलत होते.

चार महिने पगार नाही. मात्र चार महिने भ्रष्ट कारभारात पैसे आले नाहीत की यांचा जीव कासावीस होतो. ग्रामीण भागाला जोडणारी एसटी महत्वाची सेवा आहे.

जोपर्यंत एसटी मधील भ्रष्ट्राचार थांबत नाही तोपर्यंत उन्नती शक्य नाही. 1 लाख कर्मचारी अंगावर आले तर, काय करणार असा सवाल करीत राज यांनी राज्य सरकारला कोपरखळ्या मारल्या.

ST कर्मचाऱ्यांवर मेस्मा लावणे योग्य नाही. तसेच यासंबधी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहणार असल्याचेही राज यांनी म्हटले

परीक्षा घोटाळ्यांवर राज कडाडले

प्रत्येक परीक्षांमध्ये सरकारचा जो घोळ सुरू आहे. जोपर्यंत मतदार हे सर्व गांभीर्याने घेत नाही. तोवर हे असेच चालणार. लोकांनी आपला राग मतदानातून व्यक्त करायला हवा. लोकं कालातराने घटना विसरतात म्हणून परिस्थित सुधारत नाही. असे राज यांनी म्हटले.