close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

मी निर्दोष असल्याचे सरकार छातीठोकपणे का सांगत नाही- खडसे

खडसेंनी त्यांच्यासमोर आपल्या मनातील खंत बोलून दाखविली. 

Updated: Sep 2, 2018, 05:49 PM IST
मी निर्दोष असल्याचे सरकार छातीठोकपणे का सांगत नाही- खडसे

जळगाव: जमीन गैरव्यवहार प्रकरणात माझी चौकशी झाली. त्यानंतर मला क्लीन चीटही देण्यात आली. मात्र, तरीही सरकार ही गोष्ट छातीठोकपणे का सांगत नाही, असा सवाल माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी उपस्थित केला. मुक्ताईनगर येथे रविवारी एकनाथ खडसे यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला चंद्रकांत पाटीलही हजर होते. यावेळी खडसेंनी त्यांच्यासमोर आपल्या मनातील खंत बोलून दाखविली. 

मला क्लीन चीट मिळूनही सरकार जनतेसमोर तसे छातीठोकपणे का सांगत नाही? असेच सुरु राहिल्यास मी स्वत: राज्यभर दौरा करुन जनतेकडून क्लीन चीट मिळवेन, असेही खडसेंनी सांगितले. 

खडसेंच्या या विधानावर चंद्रकात पाटील यांनी फारसे न बोलणेच पसंत केले. लवकरच खडसेंना न्याय मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.