फडणवीस मंत्रीमंडळातल्या या नेत्यांना सोपा पेपरही कठीण गेला!

सोपा पेपर म्हणून पाहिलं जात असतानाच, भाजपाचा विधानसभा निवडणुकीत अपेक्षाभंग झालाय

Oct 25, 2019, 18:13 PM IST

भाजपाच्या तब्बल ८ विद्यमान मंत्र्यांनाच पराभवाला सामोरं जाव लागलं. त्यामुळे भाजपाच्या यशाच्या चवीचा गोडवा हरवला 

1/8

मंत्री महोदयांची दांडी गुल - पंकजा मुंडे

मंत्री महोदयांची दांडी गुल - पंकजा मुंडे

अवघ्या राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या बीड जिल्ह्यातल्या परळी विधानसभा मतदारसंघात, भाजपाच्या महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांना विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंकडून परभवाचा धक्का सहन करावा लागला

2/8

मंत्री महोदयांची दांडी गुल - राम शिंदे

मंत्री महोदयांची दांडी गुल - राम शिंदे

राज्यातली लक्षवेधी लढत ठरलेल्या अहमदनगर जिल्ह्यातल्या कर्जत जामखेड मतदारसंघात राम शिंदे यांना, पहिल्यांदाच निवडणूक लढवत असलेल्या राष्ट्रवादीच्या रोहित पवारांनी आसमान दाखवलं  

3/8

मंत्री महोदयांची दांडी गुल - जयदत्त क्षीरसागर

मंत्री महोदयांची दांडी गुल - जयदत्त क्षीरसागर

अटीतटीची लढत म्हणून पाहिल्या गेलेल्या बीडमधल्या निवडणुकीत शिवसेनेचे राज्यमंत्री जयदत्त क्षीरसागर यांना त्यांचा पुतण्या संदीप क्षीरसागरनं पराभवाची धूळ चारली

4/8

मंत्री महोदयांची दांडी गुल - अर्जुन खोतकर

मंत्री महोदयांची दांडी गुल - अर्जुन खोतकर

जालन्यात शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनाही पराभवाचा सामना करावा लागला

5/8

मंत्री महोदयांची दांडी गुल - विजय शिवतारे

मंत्री महोदयांची दांडी गुल - विजय शिवतारे

पुरंदर विधानसभा मतदारसंघातले शिवसेनेचे विजय शिवतारे यांनाही हार पत्करावी लागली

6/8

मंत्री महोदयांची दांडी गुल - अनिल बोंडे

मंत्री महोदयांची दांडी गुल - अनिल बोंडे

मोर्शीमध्ये भाजपाचे अनिल बोंडे यांना विजयानं हुलकावणी दिली

7/8

मंत्री महोदयांची दांडी गुल - बाळा भेगडे

मंत्री महोदयांची दांडी गुल - बाळा भेगडे

मावळमधून भाजपाचे बाळा भेगडे यांच्या गळ्यात विजयाची माळ पडू शकली नाही. 

8/8

मंत्री महोदयांची दांडी गुल - परिणय फुके

मंत्री महोदयांची दांडी गुल - परिणय फुके

साकोलीत भाजपाचे परिणय फुके यांच्या वाट्यालाही पराभव आला