1/8
राजीव भाटियाला 'अक्षय कुमार' हे नाव महेश भट्ट यांनी दिलं
2/8
दीपक तिजोरीने महेश भट्ट यांच्यावर केले आरोप
दीपक तिजोरीने महेश भट्ट यांच्यावर केले आरोप केले आहेत की, ते घाणेरडा खेळ खेळतात. आशिकीला ३० वर्षे पूर्ण झाली तेव्हा राहुल रॉय, अनु अग्रवाल आणि दीपक तिजोरी यांनी कपिल शर्माच्या शोमध्ये बोलावलं. दीपक तिजोरीला कपिल शर्माने प्रश्न विचारल्यावर त्याने फटकन असं उत्तर दिलं. `भट्ट साहब स्ट्रगलर्स के साथ गंदा गेम खेलते थे. हम स्ट्रगलर्स का एक ग्रुप था, जब आशिकी के लिए हीरो की तलाश थी, तो भट्ट साहब बोले तुम लोग सब आपसे में तय कर लो कि हीरो कौन बनेगा, मैं थोड़ी देर में आता हूं`, ऐसे में कौन दूसरे का नाम देता, राहुल रॉय बाहर से आया और हीरो बन गया.''
3/8
महेश भट्ट यांनी देखील घेतलं होतं ड्रग्स
4/8
रेखाने देखील महेश भट्टसोबत काम करण्यास दिला नकार
महेश भट्ट खास करून रिअल लाइफ स्टोरीजवर सिनेमे तयार करतात. आपल्या प्रेमाच्या गोष्टींवर अनेक सिनेमे तयार केले आहेत. कंगनाला 'वो लम्हे' सिनेमात अभिनेत्रीचा रोल दिला तो सिनेमा त्यांच्या आणि परवीन बॉबीच्या नात्यावर आधारित आहे. जेव्हा त्यांनी रेखाला 'हंसीना' सिनेमाचा पर्याय दिला. तेव्हा ती नाकारू शकली नाही. पण लोकं असं सांगतात की, महेश भट्ट यांचा या सिनेमातून रेखाचं खासगी आयुष्य जगासमोर मांडण्याचा प्रयत्न होता.
5/8
ही आहे महेश भट्ट यांची तिसरी मुलगी
संपूर्ण देश पूजा भट्ट हिला आलिया भट्टची सख्खी बहिण समजतात. मात्र आलियाची सख्खी बहिण आहे शाहीन भट्ट. महेश भट्ट आणि सोनी राजदान यांची मोठी मुलगी आणि आलियाची सख्खी बहिण. १३ वर्षांची असल्यापासून शाहीन डिप्रेशनची रुग्ण आहे. आय हॅव नेवर बीन (हॅप्पीअर). शाहीनने ''जहर' आणि 'जिस्म 2' सारख्या सिनेमातील सीन लिहिल्या आहेत. 'सन ऑफ सरदार`ची को-राइटर असून `राज 3` ची असिस्टेंट डायरेक्टर म्हणून काम केलं आहे.
6/8
श्रीदेवीने महेश भट्ट यांच्यासोबत पुन्हा काम केलं नाही
बॉलिवूडच्या हसऱ्या चेहऱ्यामागे अनेक गुपित दडलेली आहेत. श्रीदेवी आणि संजय दत्त यांच्या वादातील गोष्ट खूप कमी लोकांना माहित आहे. 'हिम्मतवाला' सिनेमाच्या सेटवर पहिल्यांदा संजय दत्तची ओळख श्रीदेवीसोबत झाली. तेव्हा संजय दत्त ड्रग्सच्या नशेत पुर्ण बुडाला होता. त्यावेळी त्याने श्रीदेवीला महत्व दिलं नाही पण श्रीदेवीला ही गोष्ट फार मनाला लागली. त्यानंतर तिने संजय सोबत बोलणं टाळलं. त्यानंतर 'जमीन' सिनेमाकरता पुन्हा ही जोडी एकत्र आली. मात्र तेव्हा श्रीदेवीने अशी अट ठेवली की एकही सिन संजय सोबत शुट करणार नाही. हा सिनेमा कधीच रिलीज झाला नाही. त्यानंतर पुन्हा एकदा संजयच करिअर चर्चेत होतं. त्याचवेळी 'गुमराह' सिनेमाकरता श्रीदेवीला महेश भट्ट यांनी तयार केलं. शुटिंग दरम्यान श्रीदेवी देखील संजय दत्तसोबत फक्त कामाचं बोलत असे. हा सिनेमा सुपरहिट झाला पण श्रीदेवी आपल्या रोलने आनंदी नव्हती. तिला असं वाटतं होतं की, संजय दत्तला जास्त महत्व देण्यात आलं आहे. त्यानंतर श्रीदेवीने संजय दत्त आणि महेश भट्ट यांच्यासोबत कधीच काम केलं नाही.
7/8
गणेश भक्त आहेत महेश भट्ट
महेश भट्ट यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की, बाप काय असतो ते मला माहित नाही? महेश भट्ट य़ांच्या आईने त्यांना वाढवलं. वडिलांना कधी त्यांनी पाहिलंच नाही. त्यांची आई एक गुजराती मुस्लिम असून त्यांच नाव शिरिन मोहम्मद अली असं आहे. त्यांच्या आईच्या प्रेमातून महेश भट्ट आणि मुकेश भट्ट यांचा जन्म झाला. महेश भट्ट यांच्या वडिलांनी त्यांना नाव दिलं. पण कधीच आईशी लग्न केलं नाही. महेश भट्ट यांच्या नावाचा अर्थ शिव असा आहे. ज्या शिवाने आपल्या मुलाचं म्हणजे गणपतीचा शिरच्छेद केला. त्यामुळे महेश भट्ट यांनी शिव कधीच आवडत नाही. मात्र गणरायाची छोटी मूर्ती घेऊनत महेश भट्ट झोपतात.
8/8