11 अफेअर, लग्नाशिवाय 24 व्या वर्षी बनली आई; आज 47 व्या वर्षी 'ही' अभिनेत्री करिअरमध्ये ठरली हीट

Entertainment :  ही अभिनेत्री तिच्या चित्रपटांपेक्षा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे कायम चर्चेत राहिली. या अभिनेत्रीने प्रसिद्ध अभिनेता, बिझनेसमन आणि मॉडेल्सना डेट केलं. मीडिया रिपोर्टनुसार तिचं आतापर्यंत 11 अफेअर्सनंतरही ते अजून अविवाहित आहे. पण ती दोन मुलींची आई आहे. 

Dec 03, 2023, 13:43 PM IST
1/8

या अभिनेत्रीने बॉलीवूडमध्ये शिखरावर असताना अक्षय कुमार आणि करीना कपूरसोबत चित्रपट करण्यास नकार दिला आणि तो तिला महागात पडला. पण आज वयाच्या 47 व्या वर्षी तिने सर्वांचे तोंड बंद करत आपण उत्तम अभिनय करु शकतो हे सिद्ध केलं. 

2/8

ही अभिनेत्री आहे सुष्मिता सेन. 'ताली' आणि 'आर्या 3' या मधील अभिनयाने तिने प्रेक्षकांची मनं जिंकली. आज ती वयाच्या 47 वर्षीदेखील करिअरच्या उंच शिखरावर आहे. 

3/8

ती करिअरच्या उंच शिखरावर असताना तिला मुलगी रेनी सेनसाठी अक्षय कुमार आणि करीना कपूरसोबतचा चित्रपट सोडावा लागला होता. या चित्रपटात तिला मुख्य भूमिका देण्यात आली होती.   

4/8

सुष्मिताने एका मुलाखतीत सांगितलं की, रेनी सेन गंभीर अवस्थेत हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्यामुळे तिला चित्रपटाचं शूटिंग अर्धावर सोडावं लागलं होतं. त्यावेळी तिच्यावर खूप टीका झाली होती. ती करिअरबद्दल गंभीर नाही. कारण तिने वयाच्या 24 व्या वर्षी एक मुलगी दत्तक घेतली होती. 

5/8

त्यावेळी तिने कसलाही विचार न करता मुलींच्या प्रकृतीसाठी तिने चित्रपट सोडला. त्यावेळी निर्मात्यांने सुष्मिताची परिस्थिती समजून घेतल्याचं तिने सांगितलं. अक्षय आणि करीनाचा अजनबी आणि ऐतराज या चित्रपटांसाठी एकत्र आले होते. 

6/8

ऐतराज चित्रपटात सुष्मिता सेनच्या जागी नंतर प्रियांका चोप्राची निवड करण्यात आली. त्यानंतर सुष्मिता सेनने दुसरी मुलगी दत्तक घेतली. 

7/8

सुष्मिता सेन तिच्या लव्ह अफेयरमुळे कायम चर्चेत राहिली. ललित मोदी, संजय नारंग, रणदीप हुड्डा, इम्तियाज खत्री, वसीम अक्रम, मुदस्सर अजीज यांच्यासह 11 जणांसोबत सुष्मिताचं नाव जोडल्या गेलं. 

8/8

सध्या सुष्मिता सेन ब्रेकअप झाल्यानंतरही रोहमन शॉलसोबत दिसून आली आहे. परत दोघांचं जुळलं असं म्हटलं जातं आहे.