1993 मुंबई बॉम्बस्फोट ते तेलगी घोटाळा... 'या' प्रकरणांमध्ये आले होते शरद पवार यांचे नाव.. जाणून घ्या..

Sharad Pawar Controversies: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी ‘लोक माझे सांगाती’ या (Lok Maze Sangati) आत्मचरित्राच्या दुसऱ्या भागाच्या प्रकाशनाच्या कार्यक्रमानंतर आपण पक्षाचे अध्यक्षपद सोडणार असल्याची घोषणा केली आहे

May 02, 2023, 21:41 PM IST
1/6

sharad pawar bomb blast

12 मार्च 1993 रोजी मुंबईत एकापाठोपाठ एक 12 बॉम्बस्फोट झाले आहेत. 11 ठिकाणी हे बॉम्बस्फोट झाले होते. या बॉम्बस्फोटांमागे दाऊद इब्राहिम आणि टायगर मेमन यांची नावे समोर आली होती. पण जेव्हा बॉम्बस्फोट झाले तेव्हाशरद पवार यांनी मुंबईत 12 नव्हे तर 13 ठिकाणी स्फोट झाल्याचे सांगितले होते. मात्र असे काहीही झाले नव्हते. तसेच  बॉम्बस्फोटानंतर विरोधकांनी शरद पवारांवर दाऊदला मदत केल्याचा आरोप केला होता.

2/6

sharad pawar wheat scam

गव्हाच्या आयातीत 12,00 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप करत भाजपने केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. सरकारने कारगिल, तोफर आणि रियाझ यांसारख्या विदेशी कंपन्यांना 5 लाख टन गहू मागवला असून त्याच्यांकडून प्रति मेट्रिक टन 320-360 डॉलरचा उच्चांकी दर स्वीकारल्याचा आरोप विरोधकांनी शरद पवार यांच्यावर केला होता.

3/6

sharad pawar sugar scam

2009 मध्ये साखरेच्या आणि कांद्याच्या किमती वाढवल्याचा आणि 2011 मध्ये आयातदारांना फायदा मिळवून दिल्याचाही आरोप शरद पवार यांच्यावर झाला होता.

4/6

sharad pawar sikhar bank scam

2019 मध्ये, ईडीने सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी शरद पवार आणि अजित पवार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. ईडीने शरद पवार आणि इतर 70 जणांविरुद्ध मनी लाँड्रिंगसह इतर प्रकरणांमध्ये गुन्हा दाखल केला होता. सुमारे 25 हजार कोटींच्या या घोटाळ्यात यापूर्वी मुंबई पोलिसांनी एफआयआरही नोंदवला होता.

5/6

sharad pawar telgi scam

कोट्यवधींच्या स्टॅम्प पेपर घोटाळ्यातील मुख्य आरोपी अब्दुल करीम तेलगीच्या खुलाशामुळे महाराष्ट्रात खळबळ उडाली होती. या प्रकरणात अब्दुल तेलगीची नार्को टेस्ट करण्यात आली होती. या टेस्टचा व्हिडीओदेखील समोर आला होता. या व्हिडीओमध्ये तेलगीने माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार,  छगन भुजबळ आणि कर्नाटकचे माजी गृहमंत्री रोशन बेग यांची नावे घेतली होती.

6/6

Sharad pawar lavasa scam

पुण्याजवळील लवासा प्रकरणावरून शरद पवार सातत्याने विरोधी पक्षांच्या निशाण्यावर आहेत. पुण्यातील मुळशी तालुक्यात राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या संकल्पनेतून लवासा प्रकल्प उभारला गेला होता. या प्रकल्पावर पवार कुटुंबाचे स्वारस्य होते असा दावा विरोधकांकडून करण्यात येत आहे. संपूर्ण व्यावसायिक दृष्टिकोण ठेऊन महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाची जमीन तीस वर्षाच्या करारावर देण्यात आली होती. मात्र यामध्ये नियमबाह्य कामे करण्यात आल्याचा आरोप करण्यात येतो. (सर्व फोटो - PTI)