2024 चे कॅलेंडर वास्तुशासत्रानुसार घरामध्ये 'या' दिशेला लावल्यास होईल लाभ

New Year 2024: घरामध्ये 2024 चे कॅलेंडर लावत असाल तर ते योग्य दिशेने लावावं,  वास्तुशास्त्रानुसार यामुळे वर्षभर सुख-समृद्धी घरात नांदते.  

Dec 29, 2023, 18:39 PM IST

New Year 2024: घरातील प्रत्येक गोष्टीचा संबंध वास्तुशास्त्राशी जोडलेला  आहे.नवीन वर्षात येणारे सण, उत्सव व इतर धार्मिक माहीतीसाठी घरात कॅलेंडर असणं महत्वाचं आहे.  

1/8

नवीन वर्ष

नवीन वर्ष अवघ्या दोन दिवसावर आले आहे.सरत्या वर्षाला निरोप देऊन येणाऱ्या नवीन वर्षाचं स्वागत आपण करत असतो. नवीन वर्षात आपण घरामध्ये अनेक नवीन गोष्टी घेत असतो. 

2/8

2024चं कॅलेंडर हे वास्तुशास्त्रानुसार कोणत्या दिशेला लावणं योग्य आहे ?

नवीन वर्षात येणारे सण, उत्सव व इतर धार्मिक माहीतीसाठी घरात कॅलेंडर असणं महत्वाचं आहे. 2024चं कॅलेंडर हे वास्तुशास्त्रानुसार कोणत्या दिशेला लावणं योग्य आहे ? चला तर मग जाणुन घेऊया. 

3/8

वास्तुशास्त्रानुसार

घरातील प्रत्येक गोष्टीचा संबंध वास्तुशास्त्राशी जोडलेला  आहे. वास्तू दोष टाळण्यासाठी त्यांना योग्य दिशेने ठेवणं गरजेचं आहे. नवीन वर्ष 2024 येणार आहे, घरामध्ये 2024 चे कॅलेंडर लावत असाल तर ते योग्य दिशेने लावावं,  वास्तुशास्त्रानुसार यामुळे वर्षभर सुख-समृद्धी घरात नांदते.

4/8

कॅलेंडर घराच्या पश्चिम दिशेला लावावं

नवीन वर्षाचं कॅलेंडर घराच्या पश्चिम दिशेला लावावं.  पश्चिम दिशा ही प्रवाहाची दिशा मानली जाते.  यामुळे लक्ष्मीची कृपा वर्षभर राहते. 

5/8

दक्षिण दिशेला कॅलेंडर ठेवू नका

घरी किंवा ऑफिसमध्ये चुकूनही दक्षिण दिशेला कॅलेंडर ठेवू नका.दक्षिण दिशा ही यमाची दिशा आहे. यामुळे आपल्या आरोग्यावर  परिणाम होऊ शकतो. कॅलेंडर  हे दरवाजाच्या मागेही ठेवू नका.

6/8

जुने कॅलेंडर

नवीन कॅलेंडर लावल्यानंतर, आपण  अनेकदा जुने कॅलेंडर त्याच्या मागे अडकवुण ठेवतो.वास्तुनुसार  हे चुकीचं आहे. त्यामुळे घरातील लोकांच्या प्रगतीत बाधा येऊ शकते. 

7/8

कॅलेंडर नदीत वाहावे

जुन्या वर्षाचं कॅलेंडर नदीत वाहावे,  कॅलेंडरमध्ये देवी-देवतांची फोटो असतात. ती एखाद्या अपवित्र ठिकाणी किंवा इकडे-तिकडे ठेवणं अशुभ मानलं जातं. 

8/8

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही.)