PHOTO : 43 वर्षीय अभिनेत्रीचं 3 अफेअर, लग्नाआधीच गरोदर राहिल्याने पालकांनी दिलेला 72 तासांचा अल्टीमेटम; अखेर तिनं...

Entertainment : बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या लग्नापूर्वी गरोदर राहिला आहेत. या 43 वर्षीय अभिनेत्रीचं 3 अफेयर होते. एवढंच नाही तर लग्नापूर्वी गरोदर असल्याचं पालकांना कळल्यानंतर तिला 72 तासांचा अल्टीमेटम मिळालं होतं.   

Dec 21, 2023, 14:44 PM IST
1/7

या बॉलिवूडमध्ये ही अभिनेत्री खूप जास्त चर्चेत होती. 3 अफेयर आणि लग्नापूर्वी प्रेग्नेट राहिल्यामुळे ती ट्रोल झाली होती. पालकांना तिच्या प्रेग्नेट असण्याची कल्पना झाल्यानंतर तिला 72 तासांचा अल्टीमेटम देण्यात आलं होतं.     

2/7

आम्ही बोलतोय, नेहा धुपिया हिचाबद्दल. 2018 मध्ये तिने गुपचूप अभिनेता अंगद बेदीशी लग्न केलं. त्यानंतर काही महिन्यांमध्येच मुलगी मेहर बेदीचा जन्म झाला. त्यामुळे गुपचूप लग्नाचं गुपित उघड झालं होतं. 

3/7

नेहाने खुद्द एका मुलाखतीत ती लग्नाआधी प्रेग्नंट असल्याचं सांगितलं होतं. या बातमीनंतर आमचं लग्न कोणत्याही तयारीशिवाय झाल्याचं ती म्हणाली.     

4/7

नेहा पुढे सांगितलं की, पालकांना तिने या बातमी बद्दल सांगितल्यावर त्यांनी लग्नासाठी 72 तासांचं अल्टीमेटम दिलं होतं.   

5/7

या अल्टीमेटमनंतर मी मुंबईत पोहोचल्यावर अंगशी घाईघाईत लग्न केलं. या मुलाखतीत ती असंही म्हणाली की, जर तुमच्या निर्णयाने कोणाचं नुकसान होणार नसेल तर ते करायला हवं.     

6/7

तसंच ती असंही म्हणाली की माझ्या प्रेग्नेंशीच्या न्यूजनंतर मी खूप ट्रोल झाली. तेव्हा चार लोक काय म्हणतात यांने मला फरक पडत नाही.   

7/7

नेहा अंगद आज सुखी संसार करत आहेत. मेहरनंतर त्यांना एक मुलगाही झाला. नेहा सोशल मीडियावर कुटुंबासोबतचे अनेक क्षणाचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.