Cricket : भीषण अपघातातून वाचले 6 स्टार क्रिकेटर्स, मृत्यूला खूप जवळून पाहिलं होतं

क्रिकेट हा जगभरात सर्वाधिक पाहिला जाणारा दुसरा खेळ आहे. जगात असे काही स्टार क्रिकेटर्स आहेत ज्यांचा अपघात झाला होता आणि यावेळी त्यांनी मृत्यू हा खूप जवळून अनुभवला. या लिस्टमध्ये भारताच्या 3 क्रिकेटर्सचा सुद्धा समावेश आहे. 

Aug 17, 2024, 17:14 PM IST
1/6

करुण नायर :

टीम इंडियाचा फलंदाज करुण नायरने टेस्टच्या इतिहासात तिहेरी शतक लगावले होते. सेहवागच्यानंतर नायरने 2016 मध्ये चेन्नई येथे खेळताना तिहेरी शतक झळकावले. याच वर्षी करुण नायर सोबत एक अपघात घडला. जुलै 2016 मध्ये तो केरळमध्ये सुट्टी एन्जॉय करण्यासाठी गेला असताना , तो आपल्या नातेवाईकांसोबत पम्पा नदी पार करून एका गावातील अरनमुला मंदिरात जात होता. मात्र यादरम्यान बोटीला अपघात झाला ज्यामुळे करूणला खूप दूर पर्यंत पोहत काठावर यावे लागले. गावातील लोकांनी त्याला वाचवले पण या दुर्घटनेत त्याने आपल्या अनेक नातेवाईकांना गमावलं होतं. 

2/6

ऋषभ पंत :

30 दिसंबर 2022 मध्ये भारताचा स्टार विकटकीपर आणि फलंदाज ऋषभ पंत याच्या कारला भीषण अपघात झाला. दिल्ली ते देहरादून मार्गावरून जात असताना त्याची कार नियंत्रणाबाहेर गेली आणि डिव्हायडरला धडकली. ऋषभ पंत या अपघातात बचावला मात्र त्याला गंभीर दुखापत झाली होती. ऋषभच्या पायांवर शस्त्रक्रिया करण्यात आली. यानंतर तब्बल एक वर्षाहून अधिक काळ तो क्रिकेटपासून दूर राहिला. मात्र त्याने आयपीएल 2024 मध्ये पुनरागमन केले. तसेच टी 20 वर्ल्ड कप 2024 मध्ये उत्तम कामगिरी करून वर्ल्ड कप सुद्धा उंचावला. 

3/6

निकोलस पुरन :

 निकोलस पुरन हा वेस्टइंडिजच्या टीममधील एक स्टार खेळाडू आहे. त्याला वेस्टइंडीज क्रिकेटचे भविष्य मानले जाते. 2015 जानेवारीमध्ये निकोलस पुरन याचा भीषण रस्ते अपघात झाला होता. यानंतर त्याच्या दोन्ही पायाची सर्जरी करण्यात आली. यानंतर काही महिने निकोलसला व्हीलचेअरवर राहावे लागले. पण त्यानंतर त्याने क्रिकेटच्या मैदानात पुनरागमन केले. 

4/6

ब्रूस फ्रेंच :

ब्रूस फ्रेंच याने इंग्लंडसाठी 3 वर्षात 16 टेस्ट आणि 13 वनडे खेळले आहेत. ब्रूट सोबत एक नाही तर अनेक अपघात घडले आहेत. 1987-88 मध्ये पाकिस्तानच्या दौऱ्या दरम्यान सराव करताना जमावातील एका प्रेक्षकाने त्याला मिळालेला बॉल ब्रूसकडे फेकला परंतु तो बॉल थेट त्याच्या डोक्याला लागल्याने त्यातून रक्त यायला लागले. यावेळी ब्रूसला लागलीच रुग्णालयात नेण्यात आले. जेव्हा तो तिथे पोहोचला आणि दारातच होता तेवढ्यात त्याच्या कारला अपघात झाला. यानंतरही सर्व काही सुरळीत झालेच नाही, ब्रुच हॉस्पिटलमध्ये खुर्चीवरून उठण्याचा प्रयत्न करत असताना डॉक्टरांच्या खोलीतील दिवा त्याच्या डोक्यावर पडला. याशिवाय 1985-86 मध्ये वेस्ट इंडिजच्या इंग्लंड दौऱ्यात फिरताना ब्रूस फ्रेंचला कुत्रा चावला होता. निवृत्तीनंतर ब्रूसने इंग्लंड टीममध्ये प्रशिक्षक म्हणून काम केले. 

5/6

ओशाने थॉमस :

वेस्टइंडीजचा गोलंदाज ओशाने थॉमस याचा फेब्रुवारी 2020 मध्ये मोठा अपघात झाला होता. या दुर्घटनेत थॉमसची कार पूर्णपणे उलटली. त्याला अतिशय बिकट अवस्थेत हॉस्पिटलमध्ये जावे लागेल. त्यानंतर काही महिन्यांनी थॉमस पूर्णपणे बरा होऊन मैदानात परतला.  

6/6

मोहम्मद शमी :

टीम इंडियाचा दिग्गज गोलंदाज मोहम्मद शमी याचा 2018 मध्ये देहरादून ते नवी दिल्ली येथे जात असताना कार अपघात झाला होता. या अपघातात शमीच्या डाव्या डोळ्याच्यावर दुखापत झाली होती. ज्यावर काही टाके सुद्धा लावण्यात आले होते. या दुर्घटनेच्यावेळी शमीची पत्नी हसीन जहाँ यांच्यात वाद सुरु होता. परंतु या अपघातातून सावरत शमीने पुन्हा क्रिकेटच्या मैदानावर पुनरागमन केले.