चमकदार त्वचेसाठी ८ परिणामकारक टिप्स...

Feb 15, 2018, 16:13 PM IST
1/9

Glowing Skin

Glowing Skin

चमकदार त्वचा सौंदर्यात भर घातले. त्यामुळे तुम्ही आकर्षक दिसता. त्वचा सुंदर, तजेलदार दिसण्यासाठी तुम्ही अनेक उपाय करत असाल. मात्र अनेकदा त्याचा हवा तसा परिणाम दिसून येत नाही. त्याउलट वाढत्या वयाचा परिणाम चेहऱ्यावर दिसू लागतो. डाग, सुरकुत्या, निस्तेज त्वचा असे परिणाम जाणवू लागल्यानंतर नेमके काय करावे ? जाणून घ्या...

2/9

Beautiful skin

Beautiful skin

ेल्दी लाईफस्टाईलच्या साहाय्याने तुम्ही वाढते वय लपवू शकता. त्वचा चमकदार दिसण्यासाठी तुम्ही पूर्णपणे फिट असणे गरजेचे आहे. त्यासाठी हेल्दी लाईफस्टाईल अंगिकारायला हवी.

3/9

Sound sleep

Sound sleep

काम जितके महत्त्वाचे आहे तितकाच आरामही महत्त्वाचा आहे. त्यामुळे शांत झोप घ्या. खाण्या-पिण्याच्या योग्य सवयींमुळे देखील फायदा होईल. पोषकघटक मिळाल्याने चेहरा तजेलदार दिसू लागेल.

4/9

Smoking and drinking

Smoking and drinking

धुम्रपान, मद्यपान याचा तुमच्या स्वास्थ्यावर गंभीर परिणाम होत असतो. स्वास्थ्यासोबतच तुमच्या त्वचेवरही त्याचा वाईट परिणाम होतो आणि तो चेहऱ्यावर दिसून येतो.

5/9

Junk food

Junk food

जंक फूड आरोग्यासाठी घातक असल्याचे आपण जाणतोच. डिप-फ्राईड, शुगर पॅक फूड याचा आरोग्यावर परिणाम होतो. त्यामुळे जितका संतुलित आहार घ्याल तितके चागंले. त्यामुळे त्वचेला पोषकघटक मिळून त्वचेचा तजेला टिकून राहतो.

6/9

Exercise and gym

Exercise and gym

स्वास्थपूर्ण आरोग्यासाठी व्यायाम महत्त्वाचा आणि गरजेचा आहे. तुमचे वय अधिक भासू लागते. हेल्दी त्वचेसाठी व्यायाम गरजेचा आहे. त्यामुळे दररोज व्यायाम करा.

7/9

stay hydrated

stay hydrated

शक्य तितके पाणी प्या. पाणी प्यायल्याने शरीर हायड्रेट राहते. परिणामी त्वचेवर झळाळी येते. त्याचबरोबर त्वचेवर सुरकुत्याही पडत नाहीत.

8/9

wrinkles

wrinkles

त्वचेला धुळ, प्रदूषण यापासून सुरक्षित ठेवा. वाढ्त्या उन्हात हानिकारक युव्ही किरणे असतात. त्यामुळे त्वचेचे नुकसान होते आणि वाढत्या वयाबरोबरच याचा परिणामही अधिक जाणवू लागतो. म्हणून चेहरा दिवसातून दोनदा तरी स्वच्छ धुवा.

9/9

Stay happy

Stay happy

तुम्ही मनातून आनंदी असाल तर ते तुमच्या चेहऱ्यावर दिसते. म्हणून नेहमी आनंदी आणि सकारात्मक रहा. त्यामुळे त्वचा देखील चमकदार दिसेल.