विधानपरिषद निवडणूक: ओळख नव्या आमदारांची...

May 18, 2020, 16:44 PM IST
1/9

राजेश राठोड - काँग्रेस

राजेश राठोड - काँग्रेस

राजेश राठोड हे काँग्रेसमधील युवा नेते आहेत. ते जालना जिल्हा परिषदेचे माजी सभापती आहेत.

2/9

रमेश कराड - भाजप

रमेश कराड - भाजप

रमेश कराड हे गोपीनाथ मुंडे यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जातात. 2018 मध्ये त्यांना राष्ट्रवादीने विधानपरिषदेचं तिकीट दिलं होतं मात्र अवघ्या पाच दिवसात त्यांनी माघार घेत भाजपमध्ये प्रवेश केला होता.

3/9

प्रविण दटके - भाजप

प्रविण दटके - भाजप

प्रविण दटके हे नितिन गडकरी यांच्या जवळचे मानले जातात. 2014-2017 या काळात ते नागपूरचे महापौर होते.

4/9

रणजितसिंह मोहिते पाटील - भाजप

रणजितसिंह मोहिते पाटील - भाजप

रणजितसिंह हे 2009 ते 2012 या कालावधीत राज्यसभेचे खासदार होते. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता.

5/9

शशिकांत शिंदे - राष्ट्रवादी

शशिकांत शिंदे - राष्ट्रवादी

सातारा जिल्ह्यातील जावळी व कोरेगावचे आमदार राहिलेले शशिकांत शिंदे राष्ट्रवादीचे आक्रमक नेते आहेत.

6/9

गोपीचंद पडाळकर - भाजप

गोपीचंद पडाळकर - भाजप

धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावर गोपीचंद पडळकर यांचं नाव महाराष्ट्राला परिचित झालं. धनगर नेते महादेव जानकर यांचे समर्थक म्हणून त्यांची ओळख.

7/9

अमोल मिटकरी - राष्ट्रवादी

अमोल मिटकरी - राष्ट्रवादी

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मिटकरी हे राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक होते. मराठा सेवा संघापासून सार्वजनिक जीवनात सक्रिय झालेल्या मिटकरी यांनी संभाजी ब्रिगेडमध्येही काम केले आहे.

8/9

नीलम गोऱ्हे या शिवसेनेच्या उपनेत्या व प्रवक्त्या आहेत. शिवसेनेतील एक अभ्यासू महिला कार्यकर्त्या म्हणून त्यांची ओळख आहे. आतापर्यंत तीनदा त्या विधानपरिषदेवर निवडून गेल्या आहेत. उपसभापतीपदावरील निवडीनंतर पहिल्या महिला उपसभापती बनण्याचा मान डॉ. गोऱ्हे यांना मिळाला आहे.

9/9

उद्धव ठाकरे - शिवसेना

उद्धव ठाकरे - शिवसेना

दिवगंत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे पूत्र आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज आमदार झाले. ठाकरे घराण्यात आणखी एका आमदाराची भर पडली आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतर 6 महिन्याच्या आत त्यांना विधीमंडळाचे सदस्य होणं आवश्यक होते.